Signs of alliance between Raj Thackeray and Uddhav Thackeray; A new chapter of 'Marathi unity' for Maharashtra?
Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: संजय राऊतचा संदेश : ‘मुंबईवर चालणाऱ्या अदाणी आक्रमणाला एकत्र येऊनच थोडगा शकतो’
मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी भाषेच्या व मराठी माणसाच्या हितासाठी महत्त्वाची राजकीय युती घडण्याच्या संकेतांनी चर्चा रंगली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे व शिवसेना (ठाकरे) या पक्षांच्या एकत्र येण्याबाबत संकेत दिले आहेत. Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance
राज ठाकरेंच्या या प्रस्तावाला शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिसाद दिला आहे. शिवसेना (ठाकरे)चे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले आहेत, “महाराष्ट्राच्या हितासाठी कोणत्याही पक्षाबरोबर यायला तयार आहोत. त्यामुळे मनसेला आमचा साद आहे.”
याशिवाय, खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब, अंबादास दानवे आणि सुनील प्रभू यांनीही युतीबाबत सकारात्मक भूमिका मांडली आहे. मात्र, मनसेने या चर्चांना अधिक ठोस स्वरूप देण्यासाठी प्रसारमाध्यमांऐवजी थेट चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे.
संजय राऊत यांनी या संदर्भात म्हटले आहे की, “मुंबईवर अदाणी आक्रमण करत असून, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा षडयंत्र रचला जात आहे. या आक्रमणाला थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात एकता आवश्यक आहे.”
त्यांनी पुढे सांगितले, “राज ठाकरे यांनी मराठी माणसासाठी स्वतंत्र संघटना उभी केली आहे. प्रकाश आंबेडकरांनीही अशीच संघटना उभी केली आहे. या सर्वांनी एकत्र यावे, अन्यथा मुंबई आपल्याकडून दूर जाऊ शकते.”
शिवसेना (ठाकरे) आणि मनसे या दोन्ही पक्षांमध्ये युतीसाठी स्पष्ट आणि निर्मळ भावना असून, महाराष्ट्राच्या हितासाठी कोणताही त्याग करण्याची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…