महाराष्ट्र
Trending
Sidharth Kharat | गृह विभागातील सहसचिव यांची स्वेच्छानिवृत्ती हाती घेतली ‘मशाल’ ; विधानसभेच्या रिंगणात
Sidharth Kharat News
मुंबई, दि. ३ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर sidharth kharat
वरिष्ठ अधिकारी म्हणून प्रशासनात काम करत असताना अनेकांची राजकारणात येण्याची इच्छा असते. अशातच निवडणुकांपूर्वी सत्तेचे अंदाज बांधून अधिकारी निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. आज मंत्रालयातील गृह विभागातील सहसचिव सिद्धार्थ खरात Sidharth Kharat यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला. सिद्धार्त खरात यांनी हातात मशाल घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गेल्या ३० वर्षांपासून प्रशासकीय सेवेत असणारे सिद्धार्थ खरात यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ येथे उद्धव शिवसेनेत प्रवेश केला. Sidharth Kharat
येत्या विधानसभा निवडणुकीत ते बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर या राखीव मतदार संघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.