Siddhant Shirsat: Serious allegations made by a married woman against the son of the Social Justice Minister; stir in state politics
Siddhant Shirsat Latest News : विरोधकांचा सरकारवर दबाव — “राजकीय सत्तेचा गैरवापर थांबवा, कठोर कारवाई करा”
मुंबई :- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट Siddhant Shirsat यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने मानसिक व शारीरिक छळाचे तसेच हुंडा मागणीचे गंभीर आरोप करत कायदेशीर नोटीस बजावली आहे. या आरोपांनी सत्तारूढ शिवसेनेच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे.
महिलेच्या वकिलांच्या माहितीनुसार, सिद्धांत शिरसाट यांच्याशी तिचे दोन वर्षांपूर्वी खाजगी विवाहसंबंध झाले होते. प्रारंभीचं सहजीवन सुरळीत होते, मात्र नंतर तिसऱ्या महिलेच्या आगमनानंतर सिद्धांत यांनी तिला दुर्लक्षित करायला सुरुवात केली आणि तिचा मानसिक छळ सुरू केला. एवढंच नव्हे तर, विरोध दर्शवल्यास स्वतःच्या डोक्यावर बंदूक ठेवून तिला धमकावल्याचेही आरोप आहेत.
पीडितेने यासंदर्भात कायदेशीर नोटीस पाठवली असून, सात दिवसांत नांदवून नेण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीन स्वतंत्र गुन्ह्यांसाठी न्यायालयात अर्ज करण्यात येईल, असा इशाराही वकिलांनी दिला आहे.
या प्रकरणावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी करत सत्तेचा गैरवापर थांबवण्याचे आवाहन केले आहे. “सत्तेच्या बळावर स्त्रियांवर अन्याय चालू द्यायचा का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या प्रकरणी तातडीची व निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली आहे. “राजकीय दबावामुळे जर गुन्हा दाबला गेला, तर हा लोकशाहीचा पराभव आहे,” असे ते म्हणाले.
विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या प्रकरणी तातडीची व निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली आहे. “राजकीय दबावामुळे जर गुन्हा दाबला गेला, तर हा लोकशाहीचा पराभव आहे,” असे ते म्हणाले.
सत्ताधारी गटाकडून यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी संजय शिरसाट यांनी ‘या आरोपांविषयी मला काही माहिती नाही’ असे सांगत या प्रकरणापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…