Shyam Manav : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ जनक दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला आहे
•उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांना तुरुंगात डांबण्यात येणार असल्याचा दावा श्याम मानव यांनी केला आहे
नागपूर :- महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ जनक बातमी बाहेर आली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट करण्यात आली आहे. अनिल देशमुख का तुरुंगात गेले यांचे कारण श्याम मानव यांनी सांगितले आहे. तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री अनिल परब यांना खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात दाबण्याचा डाव होता असा गंभीर आरोप श्याम मानव यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.
पत्रकार परिषदेमध्ये श्याम मानव म्हणाले की,
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तेव्हा सातत्याने तुमच्याकडे पाठवण्यात आलेल्या 4 प्रतिज्ञापत्रांवर स्वाक्षरी करण्याचे निरोप जात होते. यापैकी 1 प्रतिज्ञापत्र उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावले आणि दरमहा 100 कोटी गोळा करून द्या असे आदेश देणारे होते. दुसरे प्रतिज्ञापत्र उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियान नामक तरुणीवर अत्याचार करून खून केल्याचे होते.तिसरे प्रतिज्ञापत्र अनिल परब यांच्या कथित गैरव्यवहारांवर स्वाक्षरी करण्यासंबंधीचे होते. तर शेवटचे चौथे प्रतिज्ञापत्र तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुटखा व्यावसायिकांकडून पैसे गोळा करून देण्यासंबंधीचे होते. अनिल देशमुख यांनी खूप विचार केल्यानंतर समोरच्या व्यक्तीची ही ऑफर नाकारली. त्यांनी या प्रतिज्ञापत्रांवर स्वाक्षरी करण्यास साफ नकार दिला. यामुळे त्यांनाच 13 महिने तुरुंगात जावे लागले. पम कोर्टाने त्यांना क्लीनचिट दिली, असे श्याम मानव यांनी म्हटले आहे. पत्रकारांनी यावेळी त्यांना ही प्रतिज्ञापत्रे कुणी पाठवली? असा प्रश्न केला. पण त्यांनी त्या व्यक्तीचे नाव सांगण्यास नकार दिला.
महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर महायुतीची सत्ता आली. त्यानंतर लगेचच या लोकांनी आपली नखे बाहेर काढली. ती नखे आता आपल्याला ओळखता आली पाहिजेत. संजय राऊत यांच्याविरोधात आतापर्यंत काही सिद्ध झाले आहे का? असे श्याम मानव म्हणाले.
या सर्व प्रकरणावर आता अनिल देशमुख यांनीही प्रतिक्रिया दिली आहे, अनिल देशमुख यांनी श्याम मानव यांनी केलेला दावा खरा असल्याची पुष्टी केली आहे. तसेच त्यांनी या प्रकरणी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. आपल्या दाव्यांसाठी आपल्याकडे पुरावे असल्याचेही ते म्हणालेत.3 वर्षांपूर्वी प्रतिज्ञापत्राद्वारे उद्धव व आदित्य ठाकरे यांच्यावर खोटे आरोप करण्यास मला सांगण्यात आले. मी त्याला नकार दिल्यामुळे माझ्यावर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. यामागे देवेंद्र फडणवीस होते. त्यांनी त्यांच्या जवळचा एक माणूस माझ्याकडे पाठवला होता. या व्यक्तीने माझे अनेकदा फडणवीसांशी बोलणे करून दिले होते, असे अनिल देशमुख म्हणाले आहे.