पुणे, दि, ३ जून, महाराष्ट्र मिरर
कोहिनुर कट्टा तर्फे ‘सामना’ चित्रपटाला ५० वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हुल्लडबाज चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद चिंताजनक असल्याचे सूतोवाच केले.
कोहिनूर कट्ट्याच्या उद्घाटनानिमित्त राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात सोमवारी आयोजित कार्यक्रमाला ‘सामना’चे निर्माते रामदास फुटाणे, ‘मारुती कांबळेचं काय झालं’, या प्रश्नाभोवती सामना फिरविणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, कट्ट्याचे प्रमुख आणि उद्योजक कृष्णकुमार गोयल, ‘आशय फिल्म क्लब’चे सतीश जकातदार व दिग्दर्शक परेश मोकाशी उपस्थित होते. विजय तेंडुलकर, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू आणि भास्कर चंदावरकर यांच्या स्मरणार्थ पहिला साहित्य कला गौरव सामना सन्मान ‘वाळवी’च्या निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी यांना सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी कोहिनुर कट्ट्याचे प्रमुख उद्योजक कृष्णकुमार गोयल यांचा सत्कार सोलापूर जिल्हा पुणे रहिवासी संघाच्यावतीने माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत मुस्ताक मोमीन यांनी केला. यावेळी संघाचे अदनान मोमीन, अल्ताफ मोमीन, इम्रान बाबूडे, महेबूब बाबूडे, महेबूब लांडगे, सकलेन पंजेशा शफिक मोमीन, अन्वर हन्नुरे उपस्थित होते.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…