Shrikant Shinde Post For Eknath Shinde: माझे बाबा आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा मला अभिमान वाटतो ; खासदार श्रीकांत शिंदे
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मी महायुतीच्या मुख्यमंत्र्यांना जाहीर पाठिंबा देईल असे घोषित केले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यती पासून लांब झाले असून महायुतीच्या मुख्यमंत्र्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती मधील घटक पक्ष असलेल्या भाजपला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले आहे. त्यांच्याकडे 132 आमदारांचा संख्या बळ असल्याने मुख्यमंत्री हा भाजपाचाच होणार असल्याचा दावा भाजपाचे नेते सध्या करत आहे. शिवसेना शिंदे गटाकडूनही मुख्यमंत्री पदाकरिता एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे येत असताना एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे जे मुख्यमंत्री म्हणून त्याची नियुक्ती करायला त्यांना आता पाठिंबा असेल असे जाहीर केले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे Shrikant Shinde Post यांनी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर केले आहे.
मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला ‘सीएम’ म्हणजे ‘कॉमन मॅन’ समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला.
कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे.
सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर – गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे.
खूप अभिमान वाटतो बाबा!
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…