Shrikant Shinde : “महापालिकेत नाही, संसदेत आहात, मॅच्युअर व्हा!” शिंदे यांचा विरोधकांना जोरदार टोला
ANI :- संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ‘ऑपरेशन सिंदूर’वरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. आज लोकसभेत शिवसेना (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या भाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत गदारोळ केला, ज्यामुळे शिंदे चांगलेच संतापले.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार घणाघात केला. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. प्रणिती शिंदे यांनी सोमवारी संसदेत बोलताना ‘ऑपरेशन सिंदूर हा केवळ सरकारचा तमाशा होता’ असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावरूनही श्रीकांत शिंदे यांनी जोरदार टीका केली.
नेमकं काय घडलं?
श्रीकांत शिंदे आपल्या भाषणात एका कवितेच्या माध्यमातून ‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक करत होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैनिकांनी न्याय केला असून, यासाठी मी त्यांचे अभिनंदन करत आहे, असे ते म्हणाले. प्रत्येक देशवासीयांमध्ये देशभक्तीची ज्वाला आहे, असेही त्यांनी नमूद केले. मात्र, “तरीही विरोधक या ठिकाणी विचारत आहेत की दहशतवादी पहलगाममध्ये कसे आले? त्या दहशतवाद्यांचे पुढे काय झाले?” असे श्रीकांत शिंदे बोलत असताना विरोधी पक्षातील काही खासदारांनी अचानक ’50 खोके एकदम ओके’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.
या घोषणाबाजीमुळे श्रीकांत शिंदे यांच्या भाषणात अडथळा निर्माण झाला आणि ते चांगलेच संतापले. त्यांनी विरोधकांना सुनावताना म्हटले की, “तुम्ही आता मॅच्युअर व्हा, त्यातून (50 खोके एकदम ओके या घोषणेतून) बाहेर या. तुम्ही आता सभागृहात आहात. देशाच्या संसदेत आलेला आहात. तुम्ही महापालिकेत नाहीत,” अशा शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला. त्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी थांबवली.
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…