Mumbai Latest Cyber Crime News : विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावाचा पुन्हा गैरवापर; राज्यभरातील अनेक फसवणुकींचे धागेदोरे उघड
छत्रपती संभाजीनगर : कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करत सायबर ठगांनी विश्वास नांगरे-पाटील यांच्यासारखा भासणारा बनावट व्हिडिओ कॉल तयार केला आणि त्याद्वारे एका 77 वर्षीय निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याला केवळ सहा दिवसांत तब्बल 78 लाख 60 हजारांची फसवणूक केली. संपूर्ण प्रकारात आतंकवाद, मनी लॉन्ड्रिंग आणि NIA कारवाई अशा धक्कादायक गोष्टींचा उल्लेख करत पीडिताला ‘डिजिटल अटक’ होईल, अशा स्वरूपाची भीती दाखवण्यात आली.
2 जुलै 2025 रोजी पीडित अधिकाऱ्याला पोलीस वर्दीतील एका व्यक्तीचा व्हिडिओ कॉल आला. त्याने स्वतःला “संजय पिसे” म्हणून ओळख दिली व आपण आयपीएस विश्वास नांगरे-पाटील यांचे सहकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी पीडिताच्या पत्नीच्या खात्यात 2 कोटींचा संशयास्पद व्यवहार झाल्याचा आरोप केला. हा व्यवहार आतंकवादी अब्दुल सलाम या इसमाच्या खात्याशी जोडलेला असल्याचे सांगून, त्यात पीडितावरही संशय आहे, असे ठग सांगू लागले.
पीडिताने शंका व्यक्त केल्यावर, दुसरा व्हिडिओ कॉल आला. यामध्ये विश्वास नांगरे-पाटील यांच्यासारखा दिसणारा व्यक्ती, AI च्या मदतीने तयार केलेल्या व्हिडिओतून मराठीत संवाद साधत होता. त्याने स्वतःला ‘खरा’ नांगरे-पाटील असल्याचे सांगून प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी जोडले असल्याचा उल्लेख केला. कोणी याबाबत माहिती दिल्यास संपूर्ण कुटुंब अटकेत जाईल आणि संपत्ती जप्त केली जाईल अशी धमकी देण्यात आली.
या भीतीमुळे पीडिताने 2 ते 7 जुलैदरम्यान, स्वतःच्या व पत्नीच्या खात्यांमधून 78.69 लाख रुपये तीन वेगवेगळ्या खात्यांत ट्रान्सफर केले. रक्कम परत दिली जाईल, असे सांगून ठग गायब झाले. काही दिवसांनी सत्य लक्षात आल्यावर पीडिताने क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस ठगांच्या शोधात आहेत.
हे पहिले प्रकरण नाही. गेल्या काही महिन्यांत नांगरे-पाटील यांच्या नावाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली आहे:
जून २०२५: रिलायन्सचे निवृत्त अधिकारी – 60 कोटींची फसवणूक
कोल्हापूर: 3 प्राध्यापक – 3 कोटींचा गंडा
बीड: निवृत्त शिक्षिका – 8 लाखांची फसवणूक ऑगस्ट 2024: वरिष्ठ महिला – 24 लाखांची फसवणूक*
सायबर क्राइम ब्रँच यामागच्या रॅकेटचा तपास करत असून, AI तंत्रज्ञानाचा गुन्हेगारी उपयोग ही चिंतेची बाब ठरत आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही व्यक्ती मोठ्या पदावर असल्याचे सांगत असेल, तरीही पुराव्याशिवाय पैसे ट्रान्सफर करू नयेत कोणताही संशयास्पद कॉल आला तर सायबर क्राइम ब्रँच किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…