Bhiwandi Fire News : भंगाराच्या गोदामाला शुक्रवारी (22 नोव्हेंबर) सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची या आगीत भंगारासह आजूबाजूची घरं जळून खाक झाली आहेत घटना समोर आलीय.
भिवंडी :- भिवंडीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भिवंडी शहरातील नागाव परिसरातील फातमा नगर येथील एका भंगाराच्या गोदामाला शुक्रवारी (22 नोव्हेंबर) सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. Bhiwandi Fire News या आगीत मोठ्या प्रमाणात भंगारासह आजूबाजूची घरंही जळून खाक झाली आहेत. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली.पंरतु या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर वित्तीय नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाकडून प्रथम 2 गाड्या घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या. परंतु आगीचं ठिकाण अडचणीत असल्यानं अग्निशमन गाड्यांना सदर ठिकाणी पोहचण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यातच आगीची तीव्रता वाढत गेल्यानं अग्निशमन दलाची आणखी 1 गाडी अशा 3 गाड्या आणि 2 टँकर आगीच्या ठिकाणी पाचारण करण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले असता तब्बल 3-4 तासांनी आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, नागाव येथील अनमोल हॉटेलच्या पाठीमागं मोठ्या प्रमाणात भंगार साठवलेल्या गोदामाला सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास आग लागली. आगीनं काहीच वेळात रौद्ररूप धारण केलं होतं. त्यामुळं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले, मात्र आग पसरत गेल्यानं आगीवर नियंत्रण मिळवणं अशक्य होतं. पाहता पाहता या भंगार गोदामाच्या सभोवतालची अनेक घरं या आगीच्या भक्षस्थानी सापडल्यानं त्या घरांचीही राख रांगोळी झाली.