
Nalasopra Rape News : स्वत:च्या पोटच्या चार मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. छोटा राजन यांच्या टोळीचा सदस्य असलेला आरोपी पिता सिंधुदुर्गातून अटक
नालासोपारा :- स्वत:च्या पोटच्या चार मुलींवर मागच्या अनेक वर्षांपासून बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला मीरा-भाईंदर वसई विरार पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण Virar Crime Branch पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी बाप हा छोटा राजन गॅंग चा सदस्य असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीला सिंधुदुर्ग येथून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2018 पासून ते 2025 पर्यंत वेळोवेळी आरोपीने जबरदस्तीने मुलींना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन 22 वर्षीय 21 वर्षीय मुलींसोबत अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले होते. तसेच 21 वर्षीय मुलीला पाच वेळा गरोदर करून तिचे वेळोवेळी हॉस्पिटलमध्ये गर्भपात केले होते. तसेच त्याने 16 वर्षी अल्पवयीन मुलीलाही अनेक वेळा अश्लील फोटो व्हिडिओ दाखवून तिच्यासोबत अश्लील चाळे केले होते आणि बारा वर्षे मुली सोबतही असलेले चाळे केल्याचे पोलिसांच्या तपासास समोर आल्या आहे. आरोपी यांनी आपल्या 47 वर्षीय पत्नीला मारहाण करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले होते अशी तक्रार 21 वर्षीय मुलीने नालासोपारा पोलीस ठाण्यात दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी 56 वर्षी आरोपी याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अटक केली आहे. पोलिसांनी तांत्रिक आणि गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून आरोपी हा आपल्या अस्तित्व लपून बसल्या असताना पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कलम 74,75,76,79,64,64 (च) (ज) (झ) (त्र) (ड) 65,66,88,81,118(1), 11,351(3),115(2), 352 सह बालकांचे लैगींक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,5 (जे-२), (एल), (क्य), 6,8,10,12 प्रमाणे रोजी गुन्हा दाखल आहे. आरोपीच्या विरोधात नालासोपारा, माणिकपूर, सायन, कणकवली, कर्जत पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बेद्रे, प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेधे, मनोहर तावरे, आसीफ मुल्ला, पोलीस हवालदार शिवाजी पाटील, धनंजय चौधरी, विकास राजपूत, संतोष मदने, विजय गायकवाड, रविंद्र भालेराव, गोविद केंद्रे, प्रविणराज पवार, हनुमंत सुर्यवंशी, समीर यादव, संदिप शेरमाळे, रविंद्र कांबळे, पोलीस अंमलदार नितीन राठोड, तसेच महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक, तेजश्री शिंदे, सहाय्यक फौजदार आर.पी.जाधव, महिला पोलीस हवालदार भारती देशमुख, शुंभागी सुतार, पोलीस अंमलदार अक्षय हासे, महिला पोलीस अंमलदार, पुजा हांडे, सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण, सचिन चौधरी यांनी यशस्वी कामगिरी केलेली आहे.