Famous builder mangesh gaikar in Kalyan was shot : बांधकाम विकासाक मंगेश गायकर आणि त्यांचा मुलगा जखमी झाली असून त्यांना कल्याण पश्चिमच्या मीरा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.
कल्याण :-मंगेश श्री ग्रुप चे मालक आणि कल्याण डोंबिवली मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मंगेश गायकर Famous builder mangesh gaikar यांना गोळी Get Shot By Gun In Kalyan लागलेली माहिती समोर आली आहे. मंगेश गायकर आपल्या कार्यालयात असताना ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून हे नेमकं कशामुळे घडले आहे याची पाहणी पोलिसांकडून केली जात आहे. साधारण दुपारच्या दरम्यान ही घटना घडली आहे या घटनेत मंगेश गायकर आणि त्यांचा मुलगा जखमी झाला असून त्यांच्यावर कल्याणच्या मीरा रुग्णालयात उपचार चालू आहे. मंगेश गायकवाड यांच्याकडे संरक्षणासाठी देण्यात आलेल्या बंदुकीतून निघालेल्या गोळीने ही दुखापत झाली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच पोलिसांकडून ही नक्की गोळी बंदूक साफ करताना लागली का मिस फायर झाली याचा तपास पोलिसांकडून करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि अभिनेते गोविंदा यांनाही अचानक बंदुकीतुन गोळी लागल्याने त्यांनाही गंभीर दुखापत झाली होती. Kalyan Breaking News
मंगेश गायकर यांच्या कार्यालयात त्यांच्या व्यावसायातील पार्टनर एकत्र बसले होते. यावेळी बंदुक साफ करत असताना मंगेश यांच्या हातून बंदुकीतून चुकून गोळी सुटली. ती गोळी त्यांच्या हाताच्या आरपार गेली आणि नंतर त्यांच्या मुलालादेखील लागली, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेनंतर तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.या प्रकरणी गायकर यांना गोळी कशी लागली? हा तपासाचा भाग आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. त्यांच्या तपासात काय माहिती समोर येते? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Kalyan Breaking News