Shobha Bacchav : भाजपाकडून धुळे लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार शोभा बच्छाव यांच्या कथित ऑडिओ क्लिप ट्विट
•Shobha Bacchav Audio Clip काँग्रेसच्या हाताची गोवंश कत्ताला साथ.. भाजपचा गंभीर आरोप..
मुंबई :- भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र अधिकृत ट्विटर धुळे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार Shobha Bacchav यांची कथित ऑडिओ क्लिप ट्विट करत गंभीर आरोप करण्यात आले आहे. बकरी ईदच्या निमित्ताने शोभा बच्छाव यांनी गोवंश कत्तलीसाठी प्रशासनावर दबाव टाकल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. तसेच शोभा बचाव यांची कधीच ऑडिओ क्लिप देखील शेअर केली आहे. सदर ऑडिओ क्लिप खासदारांच्या आवाजाची असल्याबाबतची भाजपकडून सांगण्यात येत आहे परंतु त्याबाबत आम्ही कोणतीही पुष्टी करत नाही.
भाजप महाराष्ट्र यांच्या अधिकृत ट्विटरवर काय पोस्ट शेअर केली आहे
काँग्रेसच्या हाताची गोवंश कत्तल ला साथ…
धुळे लोकसभेच्या खासदार Shobha Bacchav यांचा गोवंश कत्तली साठी प्रशासनावर दबाव अयशस्वी मात्र ही VOTE जिहाद ची परतफेड आहे का?
हिंदूंच्या भावनांना आव्हान देण्याचे काम करत मतांसाठी धार्मिक तुष्टीकरण करणे काँग्रेसचा हा अजेंडा जनतेने आता ओळखला आहे.
ऑडिओमध्ये नेमके काय?
भाजपाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नगरसेवकांचे बंधू अब्दुल लतीफ डॉन आणि धुळे लोकसभेच्या खासदार शोभा बच्छाव यांचा आवाज असल्याचा दावा भाजपने केला आहे. यामध्ये अब्दुल लतीफ डॉन Shobha Bacchav यांच्याशी बोलत असताना रडत असल्याचे ऐकू येत आहे. दरम्यान या ऑडिओच्या सतत्येबाबत अद्याप कोणताही खुलासा आलेला नसून भाजप महाराष्ट्राकडून हे आरोप करण्यात आले आहेत.