Shivsena VS Ncp : दादा थोडे दिवस नसते आले तरी…. रामदास कदम यांची अजित पवार यांच्यावर टीका
Shivsena VS Ncp : शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी वर्धापनाच्या दिना दिवशी अजित पवार यांच्यावर टीका केली, आता अजित पवार गटाकडून रामदास कदम यांच्यावर टीका
मुंबई :- शिवसेना पक्षाच्या 58 व्या वर्धापनदिनी मुंबई दोन मिळावे भरण्यात आले होते. वरळी येथे शिंदे गटाचा तर मुंबईच्या सायन परिसरात असलेल्या षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरे गटाचे मेळावा होता. या मेळाव्यामध्ये ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणावर शिंदे गटावर आणि भाजपवर टीकास्त्र करण्यात आले होते. शिंदे गटाकडूनही ठाकरे गटावर टीका करताना महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार Ajit Pawar यांच्यावरही टीका करण्यात आली. शिवसेना वर्धापनदिन सोहळ्यात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खोचक भाष्य केले होते. याप्रकरणीच आता अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी Amol Mitkari यांनी जोरदार पलटवार केला आहे. अजितदादा वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली अशी खोचक टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. यासंदर्भात अमोल मिटकरी यांनी ट्विट केले आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेते आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट
दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका आपल्या ट्विटमध्ये अमोल मिटकरी यांनी म्हंटले आहे की, “रामदास कदमजी आपण जोरात बोललात. “मागुन आलेले अजित दादा थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं”. माहितीसाठी सांगतो ते वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं. दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका..”, असे अमोल मिटकरी म्हणाले.
काय म्हणाले होते रामदास कदम?
शिवसेना च्या या सोहळ्यात रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता शिंदे गट आणीत अजित पवार गटातच जुंपली आहे. फडणवीस साहेब धन्यवाद, पण अजितदादा थोडे दिवस महायुतीत आले नसते तर चालले असते. तसेच काही जागांवर योग्य वेळेत उमेदवार जाहीर झाले असते तर आज वेगळेच चित्र दिसले असते असे रामदास कदम म्हणाले होते.