Shivsena UBT News : राज्यात स्त्री शक्ती कायदा लागू करा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ची मागणी…
पनवेल जितिन शेट्टी : सन २०२३ मध्ये राज्यात महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचारांचा विचार करता राज्यात बलात्कारांच्या ७,५२१ घटना, अपहरणाच्या ९,६९८ घटना, हुंडाबळीच्या १६९ घटना, नातेवाईकांकडून क्रूर पद्धतीने त्रासाच्या ११,२२६ घटना, विनयभंग, लैंगिक अत्याचार १७,२८१ घटना घडल्या आहेत. तसेच मुंबईमध्ये मे २०२४ अखेर महिन्यात बाललैंगिक अत्याचार घटने संदर्भात ५०९ गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. सदरची आकडेवारी ही चिंताजनक असून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. वारंवार महिलांवर होणाऱ्या अत्याचार विरोधात स्त्री शक्ती कायदा आमलात आणण्याबद्दल आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे Shivsena UBT यांच्या आदेशानुसार पनवेल एसीपी श्री. अशोक राजपूत साहेब यांना निवेदन देण्यात आले. (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray’s demand to implement Women Shakti Act in the state)
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड श्री. शिरीष घरत साहेब, महानगर समन्वयक दिपक घरत, पुणे शहर संपर्क संघटक सौ. स्नेहल आंबेकर, माजी नगरसेविका तथा राजापूर तालुका-संपर्क संघटक सौ. समिक्षा सक्रे, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा समन्वयक सौ. नेहा माने, माजी सिंधुदुर्ग जिल्हा संघटक सौ. श्रेया परब, माजी महापौर, जिल्हा संघटीक सौ. कल्पना पाटील, उपजिल्हा संघटीका सौ. रेवती सकपाळ, तालुका संपर्क संघटिका सौ. प्रमिला कुरघोडे, तालुका संघटिका सौ. अनिता डांगरकर, शहर संघटिका पनवेल सौ. अर्चना कुळकर्णी, शहर प्रमुख प्रवीण जाधव, कुणाल कुरघोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.