FDA Take Action On Mumbai Canteen : एफडीएची तातडीची कारवाई; जेवणाच्या गुणवत्तेवरून तपासणी, कँटिनचा परवाना रद्द
मुंबई | मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवासातील एका कँटिनमध्ये झालेल्या वादामुळे शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे आमदार संजय गायकवाड MLA Sanjay Gaikwad सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. रात्रीच्या सुमारास जेवणाच्या दर्जावरून झालेल्या वादातून आमदार गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला सर्वांसमोर बेदम मारहाण केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून विरोधकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत गायकवाड यांच्यावर निलंबनाची मागणी केली आहे.
घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मारहाण योग्य नव्हती असे स्पष्ट केले, मात्र आमदार गायकवाड यांनी आपली भूमिका योग्य असल्याचं म्हणत आपला पवित्रा कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे, गायकवाड यांनी डाळीची पिशवी हातात घेऊन बनियन-टॉवेलवर थेट कँटिनमध्ये प्रवेश करत जेवणाच्या दर्जाबाबत कर्मचाऱ्यांना जाब विचारला होता.
एफडीएने तत्काळ हालचाल करत आकाशवाणी आमदार निवासातील जेवण पुरवणाऱ्या अजंता केटरर्सचा परवाना रद्द केला आहे. अन्नातील गुणवत्तेच्या तक्रारीनंतर पनीर, सॉस आणि डाळ यासह काही नमुने तपासणीसाठी घेतले गेले असून १४ दिवसांत त्याचे अहवाल येणार आहेत. एफडीएच्या नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, पुढील आदेश येईपर्यंत संबंधित केटरर्स कोणतेही खाद्यपदार्थ खरेदी, विक्री किंवा वितरण करू शकत नाही.
या प्रकरणामुळे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलं असून, प्रशासन आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…