मुंबई

Shivsena Dasara Melava : वाजत गाजत, गुलाल उधळत या! ठाकरे गटाचा दसरा मेळाव्याचा ट्रिझर रिलीज.

•Thackeray Gat Dasara Melava शिवसेना ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार?

मुंबई :-दसऱ्याच्या दिवशी राज्यात हाय व्होल्टेज राजकीय कार्यक्रम रंगणार आहे. मुंबईत दोन शिवसेनेचा दसरा मेळावा तर आमदार पंकजा मुंडे यांच्या भगवानगडावर मेळावा असणार आहे. राज्यभरात संचालन आणि विजयादशमी दिवशी नागपूर मध्ये संघ मेळावा असतो.

तत्पूर्वी शिवसेना ठाकरे दसरा मेळावा चे टीझर रिलीज केले आहेत.दुसरीकडे शिंदे गटाच्या मेळाव्याचे मैदान बदलण्यात आले आहे. आता शिंदे गटाचा मेळावा हा आझाद मैदानावर होणार आहे. पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला धनंजय मुंडे उपस्थित राहणार की नाही, यासह सरसंघचालक आणि मनोज जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टीझरमध्ये नेमके काय?

महाराष्ट्राच्या रक्षणासाठी महाराष्ट्रधर्म राखण्यासाठी ताकद निष्ठावंतांची आणि परंपरा करारी बाण्याची शिवतीर्थावर धगधगणार मशाल ठाकरेंची… विरोधकांना आता असं वाटत असेल की शिवसेनेचं काय होणार? त्यांना मला दाखवायचे आहे की शिवसेना काय करुन दाखवणार असा इशारा विरोधकांना आपल्या टीझरमधून ठाकरे गटाने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0
07:58