ShivJayanti Special : शिवजयंतीचा जल्लोष! ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने दुमदुमली गावे अन शहरे; महाराजांच्या शौर्याचे स्मरण करत द्या शिवभक्तांना शुभेच्छा

ShivJayanti Special: अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी; शिवप्रेमींसाठी खास शुभेच्छा संदेशांचा खजिना
मुंबई | आज अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. किल्ले शिवनेरीवर सनई-चौघड्यांच्या सुरात आणि ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या जयघोषात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर जगभरातील कानाकोपऱ्यात वसलेला मराठी माणूस आज शिवरायांच्या शौर्याचे आणि पराक्रमाचे स्मरण करत आहे. सोशल मीडियापासून ते गल्लीबोळापर्यंत प्रत्येक ठिकाणी भगवामय वातावरण असून, शिवभक्त एकमेकांना शुभेच्छा देऊन हा सण साजरा करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य उभे केले आणि रयतेला अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दिली. त्यांच्या याच गौरवशाली इतिहासाचा जागर करण्यासाठी खालील खास शुभेच्छा संदेश आणि मेसेजेस तुम्ही आपल्या मित्र-परिवाराला पाठवू शकता. ShivJayanti Special Message
शिवजयंतीनिमित्त पाठवा ‘हे’ खास शुभेच्छा संदेश
1.”निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी… शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!”
2.”अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे… जय शिवराय!”
3.”जगातील एकमेव राजा असा आहे, जो स्वतःच्या नावाआधी ‘श्रीमंत योगी’ लावतो. अशा रयतेच्या राजाला मानाचा मुजरा!”
4.”तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती, पण ‘स्वराज्य’ स्थापण्याची इच्छा फक्त शिवबांच्याच रक्तात होती… शुभ शिवजयंती!”
5.”दगड झालो तर सह्याद्रीचा होईन, माती झालो तर महाराष्ट्राची होईन आणि तलवार झालो तर भवानी मातेची होईन… जय भवानी, जय शिवाजी!”
6.”शिवनेरीची माती जिथे कपाळाला लागते, तिथेच स्वाभिमानाची नवी पालवी फुटते. शिवजयंतीच्या भगव्या शुभेच्छा!”
7.”इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर आणि मातीच्या कणावर ज्यांचे नाव कोरले आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज!”
8.”सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि शत्रूचे मर्दन… हेच तर आहे शिवरायांचे शासन!”
9.”मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही… स्वाभिमानाचा हा मंत्र देणाऱ्या राजाला त्रिवार अभिवादन!”
10.”सह्याद्रीच्या कडेकपारीतून आजही एकच आवाज घुमतोय… प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय!”
11.”भगवा रक्ताचा, भगवा विचाराचा… आज दिवस आहे माझ्या राजाच्या जन्मोत्सवाचा! शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा!”
12.”ज्यांचे नाव घेताच अंगावर शहारे येतात आणि मन अभिमानाने भरून येते, त्या शिवछत्रपतींना मानाचा मुजरा!”



