क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Shivaji Nagar Police : शिवाजी नगर पोलिसांचा थरारक पाठलाग; 10 लाखांच्या ‘एमडी’सह दोन तस्करांना बेड्या

Mumbai Shivaji Nagar Police Arrested Drug Paddlers : गोवंडी परिसरातील कारवाई; देवनार कचराभूमी जवळ पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मुंबई | शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली असतानाच, शिवाजी नगर पोलिसांनी मंगळवारी रात्री गोवंडी परिसरात एका थरारक कारवाईत दोन सराईत तस्करांना अटक केली. आरोपींकडून 10 लाख रुपये किमतीचे ‘एमडी’ (मॅफेड्रोन) जप्त करण्यात आले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. Mumbai Latest Crime News

संशयावरून पाठलाग आणि अटक

शिवाजी नगर पोलीस मंगळवारी रात्री गोवंडी आणि देवनार परिसरात नियमित गस्त घालत होते. यावेळी देवनार कचराभूमी परिसरात दोन तरुण संशयास्पद रितीने वावरताना पोलिसांच्या नजरेस पडले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता, पोलिसांना पाहून दोघांनीही पळ काढला. मात्र, पोलिसांनी जिद्दीने काही अंतरापर्यंत त्यांचा पाठलाग केला आणि दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले.

10 लाखांचे ‘एमडी’ जप्त

पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे अरबाज खान (25 वय) आणि शहबाज खान (25 वय) अशी असून, दोघेही गोवंडी परिसरातील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सुमारे 10 लाख रुपये किमतीचे ‘एमडी’ हे अंमली पदार्थ सापडले. पोलिसांनी हा साठा जप्त केला असून दोन्ही आरोपींना अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक केली आहे.

तस्करीचे जाळे शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान शहरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री आणि पुरवठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. हे दोन्ही आरोपी इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ कोणाकडून घेऊन आले होते आणि ते कोणाला विकणार होते, याचा शोध आता शिवाजी नगर पोलीस घेत आहेत. या कारवाईमुळे गोवंडी परिसरातील अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0