Shivaji Maharaj’s Statue Falling Down Case : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्या प्रकरणी अटकेत असलेले जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना 13 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी
Shivaji Maharaj’s Statue Falling Down Case : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्या प्रकरणी अटकेत असलेले जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना 13 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी
मुंबई :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी अटकेत Shivaji Maharaj’s Statue Falling Down Case असलेल्या मुख्य आरोपी शिल्पकार जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना न्यायालयाने आता 13 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वास्तविक आपटे हा पाच दिवसांपासून तर चेतन पाटील हा दहा दिवसांपासून पोलिस कोठडीत होता. त्यांची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
चेतन पाटील याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, आता नवीन कायद्यानुसार चेतन पाटील याची चौकशी करायची असेल तेव्हा, न्यायालयाच्या आदेशाने पोलिस त्याला ताब्यात घेऊ शकतात. या प्रकरावरुन राज्यभरातू संताप व्यक्त केल्यानंतर दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा सरकारच्या वतीने देण्यात आला होता. वास्तविक या प्रकरणातील मुख आरोपी जयदीप आपटे हा विसंगत माहिती देत असून त्यामुळे पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने तीन दिवसांची म्हणजेच 13 तारखेपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याप्रकरणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीही महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली होती. तसेच महाविकास आघाडीने घडलेल्या प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन केले होते.
सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळला. या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. भारतीय नौदलाने शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता, याचे कंत्राट ठाणे येथील जयदीप आपटे या तरुणाला देण्यात आले होते. मात्र जयदीप आपटे याला केवळ दीड ते दोन फुटांचे पुतळे साकारण्याचा अनुभव होता, तरी देखील याला कंत्राट का दिले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जयदीप आपटे कोण आहे?
जयदीप आपटे हा कल्याण येथील 25 वर्षीय तरुण आहे. याच तरुणाने राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फुटांचा ब्राँझचा पुतळा उभारला होता. मात्र जयदीप आपटे याला फक्त दीड ते दोन फुटांचे पुतळे साकारण्याचा अनुभव आहे. 28 फुट उंचीचा पुतळा उभारण्यासाठी किमान 3 वर्षांचा काळ लागतो. पण हा पुतळा जून 2023 मध्ये बनविण्यास सुरुवात केली आणि डिसेंबर 2023 पर्यंत म्हणजे फक्त 7 महिन्यात काम पूर्ण झाले, अशी माहिती जयदीप आपटे याने एका मुलाखतीत दिली होती.