Shiv Sena UBT Bhagwa Saptah: विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत उद्धव ठाकरे गट राज्यभर ‘भगवा’ सप्ताह साजरा करणार आहे.
Shiv Sena UBT Bhagwa Saptah: विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेना (ठाकरे) 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान ‘भगवा’ सप्ताह साजरा करणार आहे.
मुंबई :– शिवसेना उद्धव ठाकरे गटाने Uddhav Thackeray राज्यभरात 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान भगवा सप्ताह Shiv Sena UBT Bhagwa Saptah साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक घराघरात मशाल निवडणूक चिन्ह पोहोचवून सुमारे 50 हजार सदस्यांची नोंदणी करण्याचा पक्षाचा या सप्ताहात प्रयत्न आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातर्फे हा भगवा सप्ताह साजरा केला जाणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी केली जाईल, याशिवाय विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मतदार याद्या पुन्हा तपासण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या जातील.गटप्रमुख आणि बूथ प्रमुखांना बळ दिले जाईल. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्ष चिन्ह मशाल प्रत्येक घराघरात पोहोचण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाची सदस्य नोंदणी 50,000 च्या जवळपास असावी. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भगव्याचे साथ सोडली आहे. असा आरोप महायुतीच्या नेत्यांनी खास करून शिंदे गटाकडून करण्यात आला होता. तर भाजपाकडून ठाकरेंनी हिंदुत्व सोडलाय अशी टीका करण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आता विधानसभेच्या तयारीत लागल्या असून तत्पूर्वी त्यांनी भगवा सप्ताह हा कार्यक्रम राज्यभरात राबवणार आहे.