मुंबई
Trending

Shiv Sena symbol and name dispute: शिवसेना वादाचा अंतिम फैसला लांबणीवर; आता 8 ऑक्टोबरला सुनावणीची शक्यता

Shiv Sena symbol and name dispute: उद्धव ठाकरेंनी सरन्यायाधीशांना घातले साकडे; ‘लोकशाही वाचवा’ अशी हात जोडून विनंती

मुंबई :- गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर अंतिम निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असताना, आता या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. Shiv Sena symbol and name dispute सर्वोच्च न्यायालयाच्या संगणक प्रणालीनुसार, या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. यामुळे लवकर निकाल लागण्याची अपेक्षा करणाऱ्या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी दिसून येत आहे.

या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडण्याचे मुख्य कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या वादावर सल्ला देण्यासाठी स्थापन केलेले घटनापीठ आहे. या घटनापीठाचे न्यायमूर्ती सूर्यकांत हे देखील सदस्य आहेत. हेच न्यायमूर्ती शिवसेना प्रकरणावरही सुनावणी घेणार आहेत. घटनापीठाची सुनावणी 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान होणार असल्याने, शिवसेना वादावरची सुनावणी ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली गेली आहे.

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी साप्ताहिक ‘मार्मिक’च्या 65 व्या वर्धापनदिनी बोलताना या प्रकरणावर लवकर निकाल देण्यासाठी थेट सरन्यायाधीशांना साकडे घातले आहे. ते म्हणाले की, “देशातील लोकशाही सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर तडफडत आहे. तीन-चार वर्षे झाली तरी यावर निकाल लागलेला नाही. जर वेळेवर न्यायाचे पाणी नाही मिळाले, तर देशातील लोकशाही मरेल.” त्यांनी हात जोडून सरन्यायाधीशांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली.

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाने या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली होती, तेव्हा न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी ‘दोन वर्षे झाली आहेत, आता आम्ही एकदाच निकाल देऊ’ असे म्हणत लवकर प्रकरण संपवण्याचे संकेत दिले होते. मात्र, आता राष्ट्रपतींच्या सल्ल्यावर सुरू होणाऱ्या सुनावणीमुळे शिवसेना प्रकरणाला उशीर होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, या निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0