मुंबई
Trending

Shiv Sena-MNS Alliance News Update : “मनसे-शिवसेना युतीची चर्चा तापली, संदीप देशपांडेंच्या पोस्टने टाकला मिठाचा खडा!”

Shiv Sena-MNS Alliance News Update : ‘केम छो वरळी’ पासून ‘जलेबी-फाफडा’ पर्यंत संदीप देशपांडेंनी उघडली जुनी खदखद

मुंबई | राजकीय वर्तुळात मोठ्या उत्सुकतेने पाहिल्या जात असलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीवर आता पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. Shiv Sena-MNS Alliance News Update मनसे नेते संदीप देशपांडे Sandeep Deshpande यांनी शिवसेना (ठाकरे गट) वर थेट टीका करत एक पोस्ट एक्स (माजी ट्विटर)वर शेअर केली असून, त्यातून शिवसेनेबद्दलची नाराजी आणि जुन्या घटनांचा पुनः उल्लेख केल्याने राज-उद्धव युतीच्या चर्चांना झटका बसला आहे.

पोस्टमध्ये देशपांडे म्हणतात, “होय, आम्ही नवीन आहोत, पण केम छो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत, जिलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं कधी म्हणालो नाही. मुस्लिम मतांसाठी आम्ही आपल्या भावाच्या कार्यकर्त्यांवर वीस हजार खटले टाकले नाहीत…” या शब्दांत त्यांनी कोरोना काळातील कार्यकर्त्यांवरील कारवाई, मुस्लिम मतांचे राजकारण आणि शिवसेनेच्या भूमिकेवर जोरदार हल्ला चढवला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी “महाराष्ट्र हितासाठी आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी जुने वाद विसरून जाण्याची” भूमिका मांडली होती, ज्याला उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर दोन्ही पक्षांचे स्थानिक पातळीवरील कार्यकर्तेही एकमेकांच्या संपर्कात दिसत होते. त्यामुळे युतीची शक्यता अधिक बळकट होत असल्याचे संकेत मिळत होते.

मात्र, देशपांडे यांच्या या पोस्टनंतर युतीपूर्वीच दोन्ही पक्षांमधील जुन्या जखमा पुन्हा उघडल्याचे चित्र दिसते. विशेषतः मनसेतील काही गटांकडून अजूनही शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेतृत्वाबद्दल प्रखर नाराजी असल्याचे ही पोस्ट सूचित करते.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही युतीसंदर्भात उघडपणे सकारात्मक बोलत असले, तरी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अशात अशा प्रकारच्या सोशल मीडियावरील वक्तव्यांमुळे संभाव्य युतीच्या वाटचालीत अडथळे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0