पुणे
Trending

Shirish Maharaj More Suicide Case : संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंश यांची आत्महत्या, धक्कादायक कारणाने समोर

Shirish Maharaj More Suicide Case : संत तुकाराम महाराजांचे अकरावे 11 वंशज प्रसिद्ध व्याख्याते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक शिरीष महाराज मोरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली

पुणे :- संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज प्रसिद्ध शिवव्याख्याते ह भ पण शिरीष महाराज मोरे Shirish Maharaj More Suicide Case यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज होते. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही समोर आले नाही परंतु आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज, प्रसिध्द व्याख्याते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष महाराज मोरे यांनी काल (5 फेब्रुवारी) सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. हे वृत कळताच देहू परिसरात शोककळा पसरली आहे. मात्र, त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजलेले नाही.

शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकिक होता. दुर्दैव म्हणजे नुकताच त्यांचा विवाह ठरला आणि टिळा सुध्दा झाला होता. “ज्याच्या कपाळावर टिळा नाही, त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा,” असे आवाहन शिरीष महाराज हे हिंदूंना करत होते. ‘लव्ह जिहाद’, ‘उद्योग जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’, ‘फूड जिहाद’, धर्मांतरण या सारख्या प्रकरणावरही त्यांचे भाष्य गाजले होते.

मंत्री नितेश राणे यांच्याकडून श्रद्धांजली!

संत तुकाराम महाराजांचे वंशज,राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे स्वयंसेवक ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांचे आज आकस्मित निधन झाले.मोरे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने देवो व आत्म्यास सदगती मिळो हिचं परमेश्वरा चरणी प्रार्थना…ॐ शांती..भावपूर्ण श्रद्धांजली..

माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पाहिली श्रद्धांजली

छगन भुजबळ यांनी शिरीष महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्या शोकसंदेशात ते म्हणतात, संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि प्रसिद्ध शिवव्याख्याते शिरीष महाराज मोरे यांच्या अकस्मात निधनाची बातमी मन सुन्न करणारी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! शिवव्याख्याते म्हणून नावलौकिक असलेल्या शिरीष महाराजांचं हे निधन ही वारकरी संप्रदायाबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठी हानी आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी व माझा संपूर्ण परिवार सहभागी आहे. त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, तसेच स्व. शिरीष महाराज मोरे यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच प्रार्थना!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0