महाराष्ट्र

Shirdi News : मुंबईतील व्यापाऱ्याला गंडा ; शिर्डीतून साडेतीन किलो सोने आणि चार लाख रुपयांची रोकड लंपास

•शिर्डीतील एका हॉटेल मधून व्यापाऱ्याचे चार लाख रुपये आणि साडेतीन किलो सोने लंपास, शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आरोपींचा शोध

शिर्डी :- शिर्डीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील व्यापाऱ्याला एका हॉटेलमध्ये लूटले असून त्याच्याकडून तब्बल साडेतीन किलो सोनं आणि चार लाख रुपये रोकड असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी फिर्यादी व्यापारी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून आरोपींचा शोध चालू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोने व्यापारी गेला सुमारे आठवडाभर शिर्डीत सराफ दुकानांमध्ये सोने विक्रीसाठी जात होते. दिवसभर फिरल्यानंतर रात्री हॉटेलमध्ये परत मुक्कामी येत.त्यासाठी त्यांनी शिर्डीमधील एका हॉटेलमध्ये खोली आरक्षित केली होती. 13 मे रोजी रात्री 11 च्या सुमारास ते हॉटेलच्या खोलीत झोपलेले असताना खोलीतून तब्बल 3 कोटी 26 लाख रुपये किंमतीचे सुमारे साडेतीन किलो वजनाचे सोन्याचे विविध दागिने आणि 4 लाख रुपयांची रोकड असा ऐवज चोरीला गेला. व्यापाऱ्याने याबाबत फिर्याद दिली आहे.होलसेल सोन्याच्या फर्ममधून सुमारे 4 किलो 873 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन 7 मे रोजी शिर्डीत. त्यांच्याबरोबर त्यांचा कामगार आणि चालक, असे दोघे जण होते. ते अहिल्यानगर ते मनमाडपर्यंत विविध सराफ दुकानांमध्ये सोने विक्रीसाठी जात होते.13 मे रोजी रात्री 11 च्या सुमारास जेवण करून ते खोलीत झोपले. त्यांनी सोन्याच्या दागिन्यांची बॅग खोलीमधील खाट आणि टेबलाच्या मध्ये ठेवली होती. खोली आतून बंद होती. मालक व दोघे कामगार एकाच खोलीत होते.

vivek

Recent Posts