क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mumbai Police Transfer : राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच; मुंबईत नऊ एसीपींची बदली

Mumbai Police Latest Transfer News : 65 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि उपअधीक्षकांच्या बदल्या ; ठाणे, पुणे, मीरा-भाईंदरसह राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील अधिकाऱ्यांचा समावेश

मुंबई :- राज्य सरकारने पोलीस दलात मोठ्या प्रमाणात बदल्यांचे सत्र सुरूच ठेवले आहे. गुरुवारी गृह विभागाने 65 सहायक पोलीस आयुक्त (ACP) आणि पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये मुंबईतील नऊ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने पोलीस वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. Mumbai Police Latest Transfer News

बदली झालेल्या मुंबईतील अधिकाऱ्यांमध्ये सहायक पोलीस आयुक्त रेणुका बागडे, शशिकांत भोसले, सचिन जायभाय, मनिषा रावखंडे, कुसुम वाघमारे, योगेश गावडे, भागवत सोनावणे, शैलेश सणस आणि प्रिया पाटील यांचा समावेश आहे. तसेच, पोलीस उपअधीक्षक नीलम व्हावळ यांचीही बदली करण्यात आली आहे.

या बदल्यांमध्ये फक्त मुंबईतीलच नव्हे, तर ठाणे, मीरा-भाईंदर आणि पुणे ग्रामीण भागातील काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर, मीरा-भाईंदर-वसई-विरार आयुक्तालयातील दीपाली खन्ना, विजयकुमार मराठे आदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे, पुणे ग्रामीणमधून सहायक पोलीस आयुक्त तानाजी बर्डे आणि ठाण्यातून उत्तम कोळेकर यांची मुंबईत बदली झाली आहे. या बदल्यांमुळे विविध शहरांमधील पोलीस दलात मोठे फेरबदल झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0