क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Shilpa Shetty Raj Kundra 60 crore scam: राज कुंद्राच्या 69 कोटींच्या फसवणूक प्रकरणात शिल्पा शेट्टीलाही धक्का; 15 कोटी रुपये तिच्या खात्यात वळवल्याचा खुलासा

Shilpa Shetty Raj Kundra 60 crore scam ईओडब्ल्यूच्या चौकशीत कुंद्राकडून पैशांचे व्यवहार उघड, शिल्पाची चौकशी होणार

मुंबई :- मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) केलेल्या तपासणीत अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या पतीच्या 60 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात तिचे नाव समोर आले आहे. राज कुंद्राने फसवणूक केलेल्या रकमेपैकी 15 कोटी रुपये शिल्पा शेट्टीच्या बँक खात्यात वळवण्यात आल्याचे उघड झाले असून, लवकरच याप्रकरणी शिल्पा शेट्टीचीही चौकशी होणार आहे. Shilpa Shetty Raj Kundra 60 crore scam

काय आहे प्रकरण?

व्यवसायिक दीपक कोठारी यांनी 14 ऑगस्ट रोजी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याविरोधात 60 कोटी 48 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी हे ‘बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड’ या ऑनलाइन शॉपिंग कंपनीचे संचालक होते. 2015 ते 2023 या काळात दीपक कोठारी यांनी या कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती. परंतु, राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी ही रक्कम कंपनीच्या कामकाजासाठी न वापरता वैयक्तिक कामांसाठी खर्च केल्याचा आरोप कोठारी यांनी केला आहे.

कुंद्राच्या चौकशीतून मोठा खुलासा

आर्थिक गुन्हे शाखेने 18 सप्टेंबर रोजी राज कुंद्राची पाच तास चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान कुंद्राने पैशांचे व्यवहार अनेक कंपन्यांमध्ये वळवल्याचे मान्य केले. त्यात ‘सतयुग गोल्ड’, ‘विहान इंडस्ट्रीज’ आणि ‘बेस्ट डिल’ यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. चौकशीतून असेही निष्पन्न झाले आहे की, त्याने एकूण 25 कोटी रुपये वैयक्तिक कामांसाठी वापरले. यापैकी 15 कोटी रुपये थेट पत्नी शिल्पा शेट्टीच्या बँक खात्यात वळवण्यात आले. Shilpa Shetty Raj Kundra 60 crore scam

शिल्पा शेट्टीची चौकशी होणार

शिल्पा शेट्टीच्या खात्यात एवढी मोठी रक्कम का वळवण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत. या रकमेसंदर्भात शिल्पाने दिलेले बिल तपासले जात आहे. याप्रकरणी पुढील आठवड्यात राज कुंद्राला पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाणार असून, त्यानंतर शिल्पा शेट्टीलाही चौकशीसाठी समन्स पाठवले जाईल. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी परदेशात जाऊ नयेत यासाठी त्यांच्याविरोधात ‘लूक आऊट’ नोटीस जारी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0