Shibu Soren Passes Away: पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक दिग्गजांकडून श्रद्धांजली; राज्यात शोककळा
ANI :- झारखंड मुक्ती मोर्चाचे (JMM) सुप्रीमो आणि झारखंडच्या राजकारणातील ‘दिशोम गुरु’ म्हणून ओळखले जाणारे शिबू सोरेन यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. Shibu Soren Passes Away गेल्या अनेक दिवसांपासून ते किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर झारखंडसह देशभरात शोककळा पसरली आहे. सोरेन 81 वर्षांचे होते.
‘गुरुजीं’च्या निधनाची बातमी समजताच झारखंडमध्ये शोक व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री आणि त्यांचे पुत्र हेमंत सोरेन यांनी सोशल मीडियावर एक भावुक संदेश लिहून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यांनी म्हटले, “आदरणीय दिशोम गुरुजी आपल्याला सोडून गेले आहेत. आज मी शून्य झालो आहे.”
शिबू सोरेन यांनी झारखंडच्या स्थापनेमध्ये आणि आदिवासींच्या हक्कासाठी मोठा संघर्ष केला. बिहारमधून वेगळे राज्य निर्माण करण्याच्या आंदोलनात त्यांची निर्णायक भूमिका होती. ते तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री बनले, तसेच केंद्रात कोळसा मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
राजकीय वर्तुळातून त्यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही रुग्णालयात सोरेन कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) लिहिले की, ‘आदिवासी समाजाचा एक मजबूत आवाज हरपला. त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहील.’
1977 मध्ये निवडणूक हरल्यानंतर 1980 पासून ते अनेक वेळा खासदार म्हणून निवडून आले. ‘दिशोम गुरु’ नावाने ओळखले जाणारे शिबू सोरेन झारखंडच्या राजकारणातील एक आधारस्तंभ होते. त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
‘दिशोम गुरु’ शिबू सोरेन यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन; झारखंडच्या राजकारणातील एका पर्वाचा अंत
दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात शिबू सोरेन यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रुग्णालयात पोहोचले असता, हेमंत सोरेन यांना आपले अश्रू अनावर झाले.
पंतप्रधान मोदींनी हेमंत सोरेन यांची गळाभेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी हेमंत सोरेन रडताना पाहून उपस्थितांनाही गहिवरून आले. पंतप्रधान मोदींनी शिबू सोरेन यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना केली आणि सोरेन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
शिबू सोरेन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही रुग्णालयाला भेट दिली. शिबू सोरेन यांच्या निधनाने झारखंडच्या राजकारणातील एका मोठ्या पर्वाचा अंत झाला आहे. आदिवासींच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे आणि झारखंडच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे नेते म्हणून शिबू सोरेन यांची ओळख होती. त्यांच्या निधनानंतर देशभरातून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…