Share Market Scam : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून 300% परतावा मिळण्याचे आमिष
शेअर मार्केटमध्ये आयपीओ खरेदी केल्यास 300% परतावा परत मिळवून देण्याची हमी देणाऱ्यांनी केली लाखोंची फसवणूक
ठाणे :- शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून 300% परतावा मिळण्याचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये महिलेचे जवळपास 20 लाखाहून अधिक रकमेचे फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. Share Market Scam
फिर्यादी महिला, (55 वर्षे), विरसावरकरनगर येथे राहणाऱ्या यांना अनोळखी मोबाईलधारक इसमाने व्हॉट्स ॲपवर मॅसेज करून, व्हॉट्स ॲप ग्रुपमंध्ये ॲड करून शेअर मार्केट मधुन शेअर्स व आयपीओ खरेदी केल्यास 300 टक्के परतावा मिळण्याचे अमिष दाखवुन, त्यांचा विश्वास संपादन केला. व त्यांनतर फिर्यादी यांना आरोपीत याने फाईन फॅब्रीक बँक व अरबन कलेक्शन बँक या खातेत एकुण 20 लाख 50 हजार रूपये रक्कम भरून शेअर्स ऑनलाईन खरेदी करण्यास सांगून फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केली आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मोबाईलधारक आरोपींविरुध्द माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (क), 66(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे हे करीत आहेत. Share Market Scam