Mumbai Share Market Fraud News : मुंबई शहरातील एका व्यापाऱ्याला ऑनलाइन शेअर्समधील गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याची 14 लाख 95 हजार रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
मुंबई :- मुंबई शहरातील एका व्यापाऱ्याला ऑनलाइन शेअर्समधील गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याची 14 लाख 95 हजार रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. Mumbai Share Market Fraud News फसवणुकीप्रकरणी मुंबई सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.
52 वर्षीय तक्रारदार मुंबई परिसरात राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार हे व्यवसायिक असून त्यांना यातील आरोपींनी ते Ask Investment Manager Limited या कंपनीचे असीस्टंट असल्याचे भासवुन व त्यांचा विश्वास संपादन करुन स्टॉक ट्रेडींग करण्याकरीता तक्रारदार यांना उदयुक्त करून बनावट ॲपवर गुंतवणुक करण्यास भाग पाडून व त्यावरील खोटा नफा दर्शवुन तसेच फसवणुक करण्याच्या इरादयाने वाढीव नफा मिळण्याचे आमिष दाखवुन, कट रचुन विविध बँक खात्यांवर एकुण रु.14 लाख 95 हजार इतकी रक्कम भरण्यास भाग पाडुन आर्थिक फसवणुक केली.
तांत्रिक तपास करुन सायबर पोलीस ठाणे, पश्चिम विभाग, गु.शा. मुंबई येथील पथकाने या शेअर्स मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली भरघोस नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणा-या गुन्हयातील तीन आरोपींना पनवेल मधून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून तीन मोबाईल फोन, विविध बँकेच्या 11 पासबुक, 14 चेक बुक, 10 एटीएम कार्ड,युनिक इंटरप्रायझेस कंपनीचा स्टॅम्प जप्त केला आहे.
या प्रकरणात, पोलिसांनी सायबर ॲक्ट 319 (2), 318(4),336(2), 338, 336(3) 340(2), 61 भा. न्या. स. सह 66 (क), 66 (ड)अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सविता माळी, सहायक पोलीस निरीक्षक नितीन गच्चे करीत आहे.
अटक आरोपींची नावे
1.विपुल कमलाकर पाटणे, (वय 28)
2.अनमोलकुमार रितेश शाही (वय 20)
3.शिवम ओमप्रकाश, (वय 26 रा. पनवेल)
पोलीस पथक
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयकुत (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशिकुमार मिना, पोलीस उप आयुक्त, सायबर गुन्हे, दत्ता नलावडे, सहायक पोलीस आयुक्त, सायबर विभाग, राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताराम चव्हाण यांच्या नियत्रंणाखाली सायबर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सविता माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार गच्चे, पोलीस शिपाई विष्णू काळे, संग्राम जाधव सुयेश लोकरे, मयुर इंगळे यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…