Online Share Market Fraud News : शेअर मार्केट गुंतवणुकीमध्ये फेसबुकच्या माध्यमातून केलेल्या ट्रेडिंग मधून तब्बल 4.44 लाखांची फसवणूक, सायबर पोलीसांचे दमदार कामगिरी करत फसवणुकीतील संपूर्ण रक्कम परत मिळवून देण्यात यश
नालासोपारा :- सोशल मीडिया ग्रुप वरील शेअर बाजारातील कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर भामट्याने दिले होते. Nalasopra Online Share Market Fraud आर्थिक लोभाला बळी पडत माणिकपूर पोलीस ठाण्याच्या Manikpur Police Station हद्दीत राहणारे म्हात्रे यांनी सोशल मीडिया शेअर ट्रेडिंग मध्ये तब्बल 4 लाख 44 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. मोठ्या प्रमाणावर नफा मिळेल असे त्यांना सांगण्यात आले होते. परंतु आपली आर्थिक फसवणूक झाली आहे असे लक्षात येतात सायबर विभागाने सुंदर यांच्या गुंतवणुकीतील फसवणुक झालेली रक्कम सायबर पोलीसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा त्यांच्या मूळ खात्यात आणून देण्यास सायबर पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेअर मार्केट ट्रेडिंग मध्ये फसवणूक झालेल्या 4 लाख 44 हजार रुपये तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारदार सुंदर यांनी सोशल मीडिया वर शेअर ट्रेडिंग करून अधिक नफा मिळवण्याचे जाहिराती पाहिल्या होत्या त्या जाहिरातीमध्ये व्हाट्सअप ग्रुप मध्ये मेसेज करून तक्रारदार यांनी मोबाईल क्रमांक ऍड केला. त्यानंतर नफा मिळवण्याच्या उद्देशाने त्यांनी एकूण 4 लाख 44 हजार रुपयाचे गुंतवणूक केली होती. परंतु आपली फसवणूक झाली हे लक्षात येतात सुंदर यांनी NCCRP Portal वर तक्रार दाखल केली होती. आरोपी यांच्या व्यवहाराचे अवलोकन करून तक्रार यांनी पाठवलेले रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सर्व रक्कम गोठविले आणि त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून बँकेची पत्रव्यवहार करून तक्रारदार यांच्या मूळ खात्यावर फसवणूक झालेली 4 लाख 44 हजार रुपये परत मिळवून देण्यास सायबर पोलिसांना यश आले आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे),मि.भा.व.वि.पोलीस आयुकालय यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांचेसह सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार स्नेहल पुणे, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे, पोलीस अंमलदार कुणाल सापळे,प्रविण सावंत सायबर पोलीस ठाणे यांनी पार पाडली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…