Share Market Fraud : ऑनलाइन फसवणूक ; शेअर मार्केटच्या नावाखाली लाखोचा गंडा
Dombivli Share Market Fraud News : डोंबिवली मध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणाऱ्या तरुणाने टिळक नगर पोलीस ठाण्यात दिली तक्रार
डोंबिवली :- शेअर मार्केटचा Share market fraud नावाखाली लाखोंची एका व्यक्तीचे फसवणूक झालेली घटना समोर आली आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर शेअर मार्केट Share Market आणि ऑनलाईन ट्रेडिंग नावाखाली Online treading आर्थिक मोबदल्याच्या रूपात आमिष दाखवून आर्थिक फसवणूक झाल्याची घटना सातत्याने समोर येत आहे. पोलिसांकडून वारंवार ऑनलाईन फसवणुकी बाबत जनजागृती तसेच मार्गदर्शनही केली जात आहे तरीही जनतेची मोठ्या प्रमाणावर शेअर मार्केट आणि विविध ॲपद्वारे फसवणूक झाल्याच्या घटना समोर येत आहे. डोंबिवलीत राहणार एका व्यक्तीची जवळपास दहा लाखावून अधिक रकमेचे भोसडी झाले जी घटना टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. Thane Crime News
फिर्यादी केतन रजनिकांत मेहता, (41 वर्षे),(रा.डोंबिवली पुर्व ) यांना अनोळखी व्हॉटस ॲप मोबाईलधारक इसम याने व्हॉटस ॲप व फेसबुकवर मेसेज करुन त्यानंतर त्यांचे डिमॅट खाते सुरु करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला नफा मिळुन देण्याचे अमिष दाखवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून आरोपी याने दिलेल्या बँक खातेत एकुण 10 लाख 20 हजार रूपये रक्कम ऑनलाईन पाठविण्यास सांगुन ती परत न करता त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मोबाईलधारक आरोपीविरुध्द माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (क), 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम हे करीत आहेत. Thane Crime News