Share Market Fraud : ऑनलाईन गंडा ; शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा; आमिष दाखवून 19.55 लाखांची फसवणूक
•Ulhasnagar Share Market Fraud क्रिप्टो करन्सी, कमोडिटीज इंडीज, इंटरनॅशनल स्टॉक मार्केटिंग ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे अमिष
उल्हासनगर :- सोशल मिडीयावर झालेली सायबर चोरट्यांची ओळख एकाला महागात पडली आहे. शेअर मार्केट ट्रेंडिंगच्या नादात अवघ्या एका महिन्यात तब्बल 19 लाख 54 हजार 695 रुपये गमविले आहे. फोरेक्स करन्सी, क्रिप्टो करन्सी, कमोडिटीज इंडीझ, इंटरनॅशनल स्टॉक मार्केट ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा मिळण्याचे आमिष दाखविले होते.याप्रकरणी चेतनकुमार रसिकलाल नाई (41वर्ष, रा. उल्हासनगर-4) यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सायबर चोरट्याने यांना तीन अनोळखी व्यक्तींनी क्वॉन्टन ऄएल ट्रेडिंग कंपनी मधून बोलत असल्याचे सांगून फोरेक्स करन्सी, क्रिप्टो करन्सी, कमोडिटीज इंडीझ, इंटरनॅशनल स्टॉक मार्केट ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास अधिक नफा मिळण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर आरोपी यांनी फिर्यादी यांच्याकडून एकूण 19 लाख 54 हजार 695 रुपये ऑनलाईन रक्कम गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यांनी ही रक्कम आरोपींच्या वेगवेगळ्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने पाठवून कालांतराने कोणत्याही प्रकारे परतावा किंवा गुंतवणूक केलेले पैसे न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येतात त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमन सन 2000 चे कलम 66 (क) 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विक्रम गौंड हे करत आहे.