Share Market Fraud News : व्यापाऱ्याची फसवणूक, शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 40.66 लाखांची फसवणूक
Share Market Fraud News : व्यापाऱ्याची फसवणूक, शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 40.66 लाखांची फसवणूक डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, पोलिसांकडून अज्ञात आरोपींच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाचा गुन्हा दाखल
डोंबिवली :- शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या Share Market Fraud बहाण्याने सुमारे 40.66 लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात Dombivli Police Station फसवणुकीचे तक्रार दाखल करण्यात आली आहे. डोंबिवलीच्या रामनगर परिसरात राहणाऱ्या एका व्यवसायिकाला अज्ञात व्यक्तींनी व्हाट्सअप ग्रुप मध्ये ॲड केले आणि व्हाट्सॲप ग्रुप द्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चाळीस टक्के परतावा मिळवण्याचे आमिष दाखविले. या आमिषाला बळी पडत व्यापाऱ्याची तब्बल 40 लाख 66 हजार 450 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची तक्रार डोंबिवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. Dombivali Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान रामनगर डोंबिवली पूर्व येथे राहणाऱ्या अमेय आप्पाजी सामंत (38 वय) या व्यापाऱ्याची शेअर मार्केटच्या नावाखाली तब्बल 40 लाख 66 हजार 450 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे तक्रार दाखल केली होती. व्यापाऱ्याला एक अनोळखी व्यक्तीने व्हाट्सॲप वर लिंक पाठवून त्याद्वारे व्हाट्सॲप ग्रुप मध्ये ऍड केले त्यानंतर त्यांना स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास 40% चा अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची 40 लाख 66 हजार 450 रुपय ऑनलाइन भरण्यास सांगितले. परंतु आपण भरलेली ऑनलाइन रक्कम कोणत्याही प्रकारे परतावा न आल्याने आपली आर्थिक फसवणूक झाली आहे असे लक्षात येतात त्यांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. डोंबिवली पोलिसांकडून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. Dombivali Latest Crime News