Kalyan Share Market Fraud News : ‘प्रशिक्षण’ आणि ‘नफा’ दाखवून 50 हजारांपासून सुरू केली फसवणूक
कल्याण :- कमी काळात शेअर मार्केटमध्ये बंपर नफा मिळवून देण्याच्या आमिषाने ऑनलाईन भामट्यांनी कल्याणमधील एका महिलेला तब्बल 60 लाख 55 हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Kalyan Share Market Fraud News मे ते जुलै या तीन महिन्यांच्या कालावधीत ही फसवणूक झाली असून, महात्मा फुले पोलीस ठाण्यात या प्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Kalyan Latest Crime News
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका विमा कंपनीत नोकरी सोडलेल्या पीडित महिलेला त्यांच्या बहिणीने एका शेअर गुंतवणूकविषयक माहितीची लिंक पाठवली होती. ती लिंक उघडताच महिलेचा संपर्क चार आरोपींशी झाला. या भामट्यांनी त्यांना शेअर गुंतवणुकीचे मार्गदर्शन देण्यास सुरुवात केली. सुरवातीला, ‘प्रशिक्षण अभ्यासक्रम’ पूर्ण करण्याच्या नावाखाली महिलेकडून 999 रुपये भरून घेण्यात आले.
या आरोपींनी महिलेला छोट्या रकमांमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. महिलेने त्यांच्या बँक खात्यावर 50 हजार ते 1 लाखांच्या रकमा पाठवल्या. काही दिवसांतच ऑनलाइन माध्यमांवर त्यांना 58 लाखांचा ‘नफा’ दिसू लागला. यामुळे महिलेचा विश्वास वाढला आणि त्या आणखी गुंतवणूक करत राहिल्या.
जेव्हा महिलेने नफ्याची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी 80 लाख रुपये भरले तरच ही रक्कम काढता येईल, असे सांगितले. एवढी मोठी रक्कम भरणे शक्य नसल्याचे महिलेने सांगितल्यावर, भामट्यांनी मूळ गुंतवणूक आणि नफ्याची रक्कमही परत देण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पंकज भारद्वाज, गोपाळ लोराया, भाग्यश्री आणि प्रीती या चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…