Share Market Fraud : शेअर मार्केटचे आमिष दाखवून ऑनलाईन कोट्यावधीची फसवणूक ; नवी मुंबई सायबर सेलने केला पर्दाफाश
Navi Mumbai Arrested Share Market Fraudster : शेअर मार्केटमध्ये चांगल्या परताव्याचे आमिष दाखवुन ऑनलाईन फसवणुक करणार्या आरोपीला बिहार राज्यातून अटक
नवी मुंबई :- कंबोडिया देशात राहून भारतातील नागरिकांचे शेअर मार्केट खरेदी विक्री ट्रेडिंग च्या नावाखाली तब्बल 14 कोटी 88 लाख 91 हजार 665 रुपयांची फसवणूक झाली आहे. Navi Mumbai Cyber Fraud याप्रकरणी सायबर पोलीस ठाणे नवी मुंबई येथे बिएनएस कलम 319 (2), 318 (4), 3 (5) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम (सुधारणा) 2008 चे कलम 66 (डी) अन्वये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही फसवणूक 16 जानेवारी 2024 ते 8 ऑगस्ट 2024 या कालावधीत एवढ्या मोठया रक्कमेची फसवणूक झाली आहे.
गुन्हयाचे तपासा दरम्यान फिर्यादी यांची फसवणुक करण्याकरिता वापरण्यात आलेले मोबाईल क्रमांक यांचे तांत्रिक विश्लेषण केले नंतर आरोपीचे वास्तव हे जि. खगडिया, राज्य बिहार येथील असल्याची माहिती प्राप्त झाली होती. आरोपीचा बिहार राज्यात जावुन शोध घेतला आरोपी सुजितकुमार मदनकुमार सिंग, ( वय 30) मिळून आला आहे. आरोपीला ताब्यात घेवुन गुन्हयाचे अनुषंगाने अधिक तपास केला असता त्यांचा गुन्हयांतील सहभाग निष्पन्न झाले.गुन्हयाचा सखोल तपास करण्यासाठी त्यांना अटक करणे आवश्यक असल्याने आरोपीला सदर गुन्हयात 11 जानेवारी 2025 रोजी अटक करण्यात आली असुन सध्या 05 दिवस पोलीस कोठडीत आहे.
आरोपी याने जुन 2023 ते जानेवारी 2024 तसेच फेब्रुवारी 2024 ते जुन 2024 या कालावधी मध्ये कंबोडिया देशात Chinese लोकांचे संपर्कात राहुन कॉल सेंटर मध्ये काम करून त्याने भारतात राहणाऱ्या नागरिकांची सायबर फसवणुक केली आहे. आरोपी हा भारतामध्ये सिमकार्ड खरेदी करून कंबोडिया देशातील साथीदाराना परवित होता. तसेच अटक आरोपी हा विविध टेलिग्राम ग्रुप वरून Chinese लोकांचे संपर्कात होता. प्राथमिक तपासात अटक आरोपी हा भारता मधील अन्य साथीदारांचे संपर्कात असल्याचे दिसुन आले आहे. त्याबाबत सायबर पोलीस ठाणे, नवी मुंबई अधिक तपास करित आहे
पोलीस पथक
सायबर गुन्हा पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त, संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, अमित काळे आणि भाऊसाहेब ढोले, सहाय्यक पोलीस आयुक्त, सायबर यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम, पोलीस निरीक्षक विशाल पादीर, पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर, पोलीस उपनिरीक्षक सचिन गिड्डे, पोलीस हवालदार विजय आयरे, विनोद हिरे,भाऊसाहेब फटांगरे, पोलीस शिपाई नरहरी क्षिरसागर, महिला पोलीस शिपाई पुनम गडगे आणि सायबर पोलीस ठाण्यांचे पोलिसा निरीक्षक विशाल पाटील यांनी उघडकीस आणला आहे