Share Market Fraud : शेअर मार्केटमधून जास्त नफ्याचं आमिषाला बळी ; 5.72 लाखांची फसवणूक
Virar Latest Share Market Fraud News : सायबर पोलिसांची यशस्वी कामगिरी, तक्रारदार यांचे फसवणुकीतील रक्कम परत मिळवून देण्यास यश
विरार :- सायबर भामट्यांनी चोरीचा Cyber Criminal आता नवीन धंदा चालू केला आहे. यामध्ये खास करून शेअर ट्रेडिंग च्या नावाने फ्रॉड Share Market Trading ची संख्या वाढतच आहे. शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक होणाऱ्यांनी जर त्वरित सायबर पोलिसांना Cyber Police तक्रार केली तर तुमचे फसवणुकीतील रक्कम परत मिळवून देण्यास सायबर पोलीस नक्कीच यशस्वी कामगिरी करत आहे. अशीच एक घटना विरार येथे राहणाऱ्या तांडेल यांच्यासोबत झाली आहे. सायबर फसवणुकीमध्ये तांडेल यांचे पाच लाख 72 हजार 832 रुपयांची आर्थिक फसवणूक झाली होती. परंतु तांडेल यांनी सायबर पोलिसांना या संदर्भात तक्रार करून सायबर पोलिसांनीही यशस्वी कामगिरी करत तांडेल यांचे फसवणुकीतील पूर्ण रक्कम मिळवून देण्यास यश आले आहे. Virar Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार आहे तांडेल यांना मोबाईलवर एक लिंक प्राप्त झाली होती. त्या लिंक द्वारे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा मिळेल या आमिषाला बळी पडत तांडेल यांनी त्या लिंक मध्ये आर्थिक गुंतवणूक केली होती. तांडेल यांना नफा झाल्याची रक्कम दिसत होते परंतु ती रक्कम काढण्यासाठी कोणताही पर्याय नसल्याने आपली आर्थिक फसवणूक झाली असे लक्षात येतात तांडेल यांनी सायबर पोलिसांना तक्रार दिले. पोलिसांनी तक्रारदार यांनी वेळोवेळी केलेले आर्थिक व्यवहाराची तपासणी करून सर्व रक्कम पोलिसांना गोठाविण्यात आली. पोलिसांनी बँकेची आणि न्यायालयाची पत्रव्यवहार करून फसवणुकीतील रक्कम तांडेल यांच्या मूळ खात्यावर परत मिळवून देण्यात यश आले आहे. पोलिसांना फसवणुकीतील पाच लाख 72 हजार 832 रुपयांची रक्कम तांडेल यांच्या खात्यात परत मिळवून देण्यास यश आले आहे. Virar Latest Crime News
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.मा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, सहाय्यक फौजदार मिलाग्रिस फर्नाडिस, पोलीस अंमलदार सावन शेवाळे, प्रशांत बोरकर, महिला पोलीस हवालदार माधुरी धिडे यांनी पार पाडली आहे.