Share Market Latest Crime News: 49 वर्षीय व्यक्तीला शेअर बाजारातील गुंतवणुकीचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक सायबर पोलीस ठाणे उत्तर विभाग, मुंबई यांनी केली आहे
मुंबई :- IIFL Securities Limited यामध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल दोन कोटी 77 लाख 42 हजार 651 रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गोरेगाव येथील रहिवासी असलेल्या तक्रारदार यांनी याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बँक व्यवहाराच्या माध्यमातून पोलीस तपास करीत आहेत.
तक्रारदाराने फेब्रुवारी ते मार्च दरम्यान मध्ये एक इंटरनेट लिंक उघडली होती. त्यावेळी त्यांना एका व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये सामिल करण्यात आले. या ग्रुपचे नाव K05-IILFL Securities Limited या ग्रुपमध्ये शेअरसंदर्भातील दैनदिन माहिती दिली जात होती. ग्रुपमधील ॲडमिन सभासदांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा सल्ला देत होता. कुठल्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास किती फायदा होईल, कोणते आयपीओ फायदेशीर आहेत, याबाबत माहिती मिळत असल्याने त्यांना शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत आकर्षण निर्माण झाले. त्यामुळे त्यांनी ॲडमिनशी चर्चा केली. त्यांना एक लिंक पाठवण्यात आली. त्यानंतर ते दुसऱ्या व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये सामिल झाले. आरोपींनी अनोळखी लिंक पाठवून त्याद्वारे IIFL Markets नावाने बनावट रित्या तयार केलेले ट्रेडिंग ॲप डाऊनलोड करण्यास भाग पडून त्याद्वारे ट्रेडिंग, क्यू आय पी आणि आयपीओ खरेदी करण्याच्या भाड्याने वेगवेगळ्या बँकेच्या खात्यातून त्यामध्ये करोडे रुपये टाकण्यास सांगितले. फिर्यादी यांनी करोडो रुपयांच्या गुंतवणुकीवर होणारा फायदा बनावाट्रेत्या ॲप मध्ये टाकला त्यांचा विश्वास संपादन करून झालेल्या फायद्याचे रक्कम काढून घेण्याच्या प्रयत्न केला असता त्यांना टॅक्स, क्रेडिट स्कोअर कमी झाला असे आहे अशा वेगवेगळ्या कारणास्तव विविध रक्कम भरणा करण्यास पाडून तब्बल दोन कोटी 77 लाख 42 हजार 651 रुपयांची आर्थिक फसवणूक केली होती.
सायबर पोलिसांनी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून आरोपींच्या वेगवेगळ्या बँकेत खात्याच्या मदतीने आयडीएफसी फास्ट बँक खाते रुद्र इंटरप्राईजेस या बँक खात्यामध्ये एकूण 71 लाख 22 हजार 999 असेल लाख रुपये भरल्याचे दिसले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि प्रत्यक्ष तपासणी करून फसवणुकीतील रक्कम ज्या बँक खात्यात जमा झाले त्या बँक खात्याच्या आधारे पोलिसांनी आरोपी मुख्य आरोपी आणि त्यांच्या साथीदाराला बांद्रा मुंबई येथून अटक केली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या नावे ऋषक मोहन शिरोडकर (वय 38),कृष्णा अरूण गवळी, (वय 24),सोहेल नझिर अहमदर शेख उर्फ जॅक,(वय 30) असे असून 04 मोबाईल फोन आणि येस बँक, आय.डी.एफ.सी. फर्स्ट बैंक चे धनादेश, डेबिट कार्ड हस्तगत करण्यात आले आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर,विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशीकुमार मीना, पोलीस उप आयुक्त, दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त शिरतोडे, प्रभारी पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण आहेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पाचांगणे, पोलीस उपनिरीक्षक धनवेश पाटील, महिला पोलीस हवालदार प्राची मुळीक, पोलीस हवालदार उतेज परब, किरण वसईकर, पोलीस शिपाई हबीब सय्यद,गायकवाड यांनी पार पाडली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…