•Share Market Scam News शेअर मार्केटच्या ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात नफा मिळवण्याचे आमिष तक्रारदाराला भोवलं ; सायबर पोलिसांची यशस्वी कामगिरी फसवणुकीतील संपूर्ण रक्कम मिळवून देण्यास यश
मिरा रोड :- सायबर भामट्यांनी चोरीचा आता नवीन धंदा चालू केला आहे. यामध्ये खास करून शेअर ट्रेडिंग च्या नावाने फ्रॉड ची संख्या वाढतच आहे. शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक होणाऱ्यांनी जर त्वरित सायबर पोलिसांना तक्रार केली तर तुमचे फसवणुकीतील रक्कम परत मिळवून देण्यास सायबर पोलीस नक्कीच यशस्वी कामगिर करत आहे. अशीच एक घटना मिरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या महेश गोपाळराव गाढवे यांच्यासोबत झाली आहे. सायबर फसवणुकीमध्ये गाढवे यांचे 3 लाख 28 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाली होती. परंतु काशिगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आरोपींच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 420,34 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमन 2008 कलम 66 (डी), 66 (सी) या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रार करून सायबर पोलिसांनीही यशस्वी कामगिरी करत फसवणुकीतील संपूर्ण रक्कम मिळवून देण्यास यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील मिरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार आहे. गाढवे यांना शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा मिळेल या आमिषाला बळी पडत गाढवे यांनी त्या मध्ये आर्थिक गुंतवणूक केली होती. परंतु गुंतवणूक केलेल्या रक्कमेपैकी कोणत्याही प्रकारे परतावा न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाली असे लक्षात येतात गाढवे यांनी सायबर पोलिसांच्या NCCRP Portal वर तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारदार यांनी वेळोवेळी केलेले आर्थिक व्यवहाराची तपासणी करून सर्व रक्कम पोलिसांना गोठाविण्यात आली. पोलिसांनी बँकेची आणि न्यायालयाची पत्रव्यवहार करून फसवणुकीतील रक्कम गाढवे यांच्या मूळ खात्यावर परत मिळवून देण्यात यश आले आहे. पोलिसांना फसवणुकीतील 3 लाख 28 हजार रुपयांची रक्कम गाढवे यांच्या खात्यात परत मिळवून देण्यास यश आले आहे.
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1, मिरा रोड, विजय कुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाल राहुलकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी पार पाडली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…