मूळ पवार, बाहेरचे पवार….. शरद पवार यांचे वक्तव्य
Sharad Pawar asked who is original pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सांगितले की, शरद पवार यांनी जे वक्तव्य केले आहे ते खूपच वेदनादायी
पुणे :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांचे पत्नी व महायुतीच्या बारामती लोकसभा Baramati Lok Sabha Election मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार Sunetra Pawar या मूळ पवार नाही असे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar यांनी केले आहे. त्यावर आक्रमक टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सांगितले की, शरद पवार यांनी जे वक्तव्य केले आहे ते खूपच वेदनादायी होते. मुलगी ही लक्ष्मी आहे तर सून ही महालक्ष्मी आहे. मुळात महिलांबाबत शरद पवार यांनी आतापर्यंत जे धोरण राबवले आज त्याच्याच विरोधात वक्तव्य ते करतात याची कल्पना त्यांना आली नसेल.विकासाचे मुद्द्यावर ते न बोलता भावनिकेतकडे निवडणूक घेऊन जात आहे.
शरद पवारांचे वक्तव्यावरुन बारामतीसह राज्यभरातील सुनांना अत्यंत वेदना झाली आहे. शरद पवार हे अशाप्रकारचे वक्तव्य कसे करु शकतात. त्यांच्या मुलीसाठी ते धृतराष्ट्र झालेले आहे त्यामुळे त्यांना सून परकी वाटत असेल. निवडणूका येता-जातात बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद भावजय या एकमेकींच्या विरोधात आहे. जनता त्यांना जे योग्य वाटेल त्यानुसार विकासाचे कामांना ते मतदान करतील. परंतु शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याने अशाप्रकारे वक्तव्य करणे दुखःदायक आहे. सुनांनी याबाबत बोलले पाहिजे, बारामती मध्ये देखील अनेक सुना लग्न करुन आलेल्या आहे. त्यांनी तुमचे कुळ वाढविण्याचे काम केलेले आहे. त्यांना मुळ कुळापासून वेगळे दाखवणार असेल जसे मुळ पवार व बाहेरचे पवार हे दाखवणे चुकीचे आहे. प्रत्येक सुन या गोष्टीचा निषेध व्यक्त करते. त्यांच्याकडून अशाप्रकारचे वक्तव्याची अपेक्षा नव्हती, त्यांचे काम मोठे असल्याने त्यांना मानपान आम्ही राखतो. त्यांच्यावर एकदाही टीका आम्ही करत नाही. परंतु मुलीच्या प्रेमापोटी त्यांनी जे वक्तव्य केले त्याने अनेक माता, सुना यांनी दुःख व्यक्त केले. स्वतःचे मुलीवर कोणपण प्रेम करते परंतु सुनावर प्रेम करणारे व्यक्तीमत्व त्यांना आतापर्यंत मानत होतो परंतु सत्य समोर आल्याने आमचा भ्रमनिरास झाला आहे.सुनेत्रा पवार या पवार कुटुंबाकडे आल्यावरच त्यांचे कुळ कुटुंबवत्सल झाले आहे. ज्या शरद पवारांनी महिला पुढाकाराचे धोरण राबवले आज तेच राजकारणासाठी अशाप्रकारचे खेदजनक वक्तव्य करतात ही शरमेची बाब आहे. ते याठिकाणी न्याय करताना चुकत आहे. ही निवडणूक पोटच्या मुलीची व सुनेतील आहे. निवडणूक काळात त्यांनी अशाप्रकारे वक्तव्य करणे सर्व समाजासाठी धक्कादायक बाब आहे.