घरातील लेक ही वंशाचाच नव्हे तर विचारांचाही दिवा तेवत ठेवू… शरद पवार गटांकडून व्हिडिओ व्हायरल
Sharad Pawar Shared Old Video On Twitter : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून जुना व्हिडिओ शेअर करत विरोधकांना उत्तर
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार Sharad Pawar गटाने बुधवारी शरद पवार यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओत शरद पवार वंशाच्या दिव्यावर आपले पुरोगामी विचार मांडताना दिसून येत आहेत. घरातील लेक ही वंशाचाच नव्हे तर विचारांचा दिवाही तेवत ठेवू शकते, असा पुढारलेला विचार केवळ शरद पवारांसारखा दृष्टा नेताच रुजवू शकतो, असे शरद पवार गटाने हा व्हिडिओ ट्विट करताना म्हटले आहे. विशेषतः मुलीला मुलासारखे वाढवून, समान संधी देऊन तिच्याकडून उत्तम काम करून घेऊ शकतो, असा विश्वासही पवार या व्हिडिओत व्यक्त करताना दिसून येत आहेत. Sharad Pawar Shared Old Video On Twitter
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ट्विट केलेल्या व्हिडिओत मुलाखतकार शरद पवारांना विचारतात की, आपल्या देशात मुलगा हा वंशाचा दिवा असे मानतात, मग तुम्हाला एकच मुलगी का? तुम्ही यासंबंधीच्या प्रश्नांना सामोरे कसे जाता? त्यावर शरद पवार म्हणतात, हा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो. विशेषतः ग्रामीण भागात गेल्यानंतर हा प्रश्न केला जातो. मुलगा असता तर बरे झाले असते. शेवटी नाव चालवण्यासाठी, बरे वाईट झाल्यानंतर अग्नी देण्यासाठी मुलगा पाहिजे, असे म्हटले जाते. माझ्या मते, हा प्रत्येकाच्या बघण्याचा दृष्टिकोन आहे. अग्नी देण्यासाठी कुणीतरी असला पाहिजे याची चिंता करायची की जीवंत असताना नीटनेटके वागण्याची चिंता करायची. Sharad Pawar Shared Old Video On Twitter
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने ट्विट काय?
घरातील लेक ही वंशाचाच नव्हे तर विचारांचाही दिवा तेवत ठेवू शकते… असा पुढारलेला विचार आदरणीय श्री. शरद पवार साहेबांसारखा द्रष्टा नेताच रुजवू शकतो. म्हणून महाराष्ट्र देशातील इतर राज्यापेक्षा वेगळा ठरतो. बाकी बुरसटलेल्या विचारधारेच्या आहारी गेलेल्यांना वंशाचा दिवा, आडनावाची फुशारकी, माहेरवास, सासुरवास ह्यात रमू दे, त्यांना प्रागतिक महाराष्ट्र कळलाच नाही, असे शरद पवार गटाने आपल्या व्हिडिओत म्हटले आहे.