क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Jalna Commissioner Bribe News : महानगर पालिकेचा आयुक्त लाच घेताना रंगेहात पकडला!

Jalna Commissioner Santosh Khandekar Arrested by ACB:  : जालना प्रशासनाला झटका – भ्रष्टाचाराचा थेट पुरावा!

महाराष्ट्र मिरर
विवेक राजेंद्र जगताप
जालना

Jalna Bribe News : राज्यातील प्रशासनात स्वच्छतेचे बोलबाले असताना जालना महानगर पालिकेचा आयुक्त संतोष महादेव खांडेकर (वय ४८) यांनी जनतेच्या पैशावरच डल्ला मारण्याचा प्रकार उघड झाला आहे.Jalna Commissioner Santosh Khandekar Arrested by ACB कंत्राटदाराकडून बील मंजूर करण्यासाठी तब्बल ₹२० लाख लाचेची मागणी करून त्यापैकी ₹१० लाख स्वीकारताना हे आयुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या हाती रंगेहात पकडले गेले!Jalna ACB Trap News

“काम करा पण आमच्या खिशातून तेल गेलं पाहिजे!”

हाच फॉर्म्युला जालना महानगर पालिकेत राबवला जात असल्याचे उघड झाले आहे.
कंत्राटदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील —
वाल्मिक नगर, भक्कड फॉर्म, भवानी नगर, हिंदनगर —
या भागातील रस्ते व गटार बांधकामांच्या बील मंजुरीसाठी
खांडेकर यांनी २० लाखांची लाच मागितली,
आणि त्यातील १० लाख प्रत्यक्ष त्यांच्या कुंडलिका निवासस्थानी स्वीकारताना
त्यांना लाचलुचपत विभागाने सापळा रचून पकडले. Jalna Anti Corruption Bureau Latest News

सत्तेच्या निवासस्थानी लाचेचा खेळ!

गेल्या काही वर्षांत पालिका प्रशासनावर भ्रष्टाचाराचे ढग दाटलेले असताना,
आयुक्तांच्या निवासस्थानीच “लाचेची झडी” लागल्याने
जालना शहरातील जनतेत संताप उसळला आहे.
मोतीबागेजवळील ‘कुंडलिका’ बंगल्यावर लाचेचा व्यवहार
होत असतानाच सापळा रचून पोलीस पथकाने
१० लाख रुपये आणि सॅमसंग मोबाईल जप्त केला.

लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

हि कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना
चे पोलीस उपअधीक्षक बी. एस. जाधवर
यांच्या नेतृत्वाखाली झाली.
या कारवाईला पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे
आणि अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांचे थेट मार्गदर्शन लाभले.
संपूर्ण पथकाने ही मोहीम अत्यंत गुप्ततेने पार पाडली.

जनतेचा संताप — “आमच्या पैशावर यांची मस्ती!”

जालना शहरातील नागरीकांच्या कराच्या पैशावर रस्ते, गटारे आणि इमारती उभ्या राहतात,
पण त्या पैशांवरही काही अधिकारी आपले हात स्वच्छ करतात, हे पाहून नागरिकांत तीव्र नाराजी पसरली आहे.
“ही प्रशासनाची लाज नाही का?”
“अशा अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून तुरुंगात पाठवा!”
असे जोरदार प्रतिपादन स्थानिक नागरिकांनी केले आहे.

जनतेला आवाहन

लाच मागणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यांविरोधात
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना येथे तक्रार करा:
📞 ०२४८२-२२०२५२ / टोल फ्री १०६४
📱 ९७६४०२१०६४ / ९८८१४६३३६५
✉️ dysp.acbjalna@mahapolice.gov.in

“लोकांचा विश्वास हादरवणाऱ्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करा!”
अशी मागणी जनतेकडून होत आहे.
जालना महानगर पालिकेच्या Jalna Municipal Commissioner इतिहासात हा एक काळा अध्याय ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0