पुणे

Sharad Pawar : शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा; पुढील 48 तासांत मिळणार डिस्चार्ज

Sharad Pawar Health Update : रुबी रुग्णालयातील डॉक्टरांची माहिती, सर्व रिपोर्ट समाधानकारक | आठवड्याभरात दुसऱ्यांदा करण्यात आले होते दाखल

पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar यांच्या प्रकृतीबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत असलेल्या पवारांच्या प्रकृतीत आता लक्षणीय सुधारणा झाली असून, त्यांना पुढील 48 तासांत रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

डॉक्टरांची प्रतिक्रिया आणि प्रकृती अहवाल

रुबी रुग्णालयातील डॉ. परवेझ ग्रॅण्ट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “शरद पवार यांची प्रकृती सध्या चांगली असून ते उपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहेत. त्यांच्या सर्व वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्या असून त्यांचे रिपोर्ट्स समाधानकारक आहेत. कालपासून त्यांनी व्यवस्थित जेवणही केले आहे. पुढील 48 तासांत त्यांना डिस्चार्ज मिळेल, त्यानंतर ते घरीच विश्रांती घेतील. सध्या काळजी करण्यासारखे कोणतेही कारण नाही.”

आठवड्याभरात दुसऱ्यांदा अस्वस्थता

बारामती येथील ‘गोविंदबाग’ निवासस्थानी असताना शरद पवार यांना अचानक खोकला आणि कफचा त्रास जाणवू लागला होता. स्थानिक डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तातडीने पुण्यातील रुबी रुग्णालयात हलवण्यात आले. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यातही त्यांना अशाच त्रासामुळे पाच दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार पूर्ण करून घरी परतल्यानंतर पुन्हा अस्वस्थता जाणवल्याने समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला

खासदार सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच डॉक्टरांच्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि राजकीय घडामोडींना वेग आला असताना, पवारांच्या प्रकृतीमुळे त्यांच्या दौऱ्यांवर मर्यादा येण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस पूर्णतः विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून, 48 तासांनंतर ते बारामती किंवा मुंबईतील निवासस्थानी रवाना होतील.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

12 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

12 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

18 hours ago