क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Oshiwara Police News : ओशिवरा पोलिसांची मोठी कारवाई! जोगेश्वरी येथे 16 लाखांची ‘ब्राउन शुगर’ विक्री करणाऱ्या दोन तस्करांना अटक

Oshiwara Police Arrested Drug Seller : गस्त घालणाऱ्या पथकाला फुटपाथवर दोन संशयित दिसले; पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना शिताफीने ताब्यात

मुंबई :- अंमली पदार्थांच्या तस्करांविरोधात मुंबई पोलिसांनी आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्याच्या पथकाने 28 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी एका मोठ्या कारवाईत 16 लाख 62 हजार रुपये किंमतीची ‘ब्राउन शुगर’ विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगणाऱ्या दोन आरोपींना जोगेश्वरी (पश्चिम) परिसरातून अटक केली आहे. Oshiwara Police Latest News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळच्या सुमारास पोलीस पथक ओशिवरा पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. यावेळी मेगा मॉल गेटजवळ, टेम्पोच्या बाजूला, फुटपाथवर दोन इसमांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी त्यांना हटकताच ते दोघेही घाईगडबडीने पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, पोलीस पथकाने तातडीने त्यांना जागीच अटकाव केला. Mumbai Latest Crime News

बॅगेत आढळली ‘ब्राउन शुगर’

पंचांसमक्ष त्यांची चौकशी करण्यात आली असता, त्यांच्याकडे असलेल्या बॅगेमध्ये “ब्राउन शुगर” हा अंमली पदार्थ असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर NDPS कायद्यातील तरतुदीनुसार पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला घटनास्थळी बोलावून पंचांसमक्ष आरोपींची अंगझडती घेण्यात आली.यावेळी आरोपींच्या बॅगेत 66.48 ग्रॅम वजनाचा, ज्याची किंमत अंदाजे 16 लाख 62 हजार रुपये आहे, तो ‘ब्राउन शुगर’ अंमली पदार्थ मिळून आला.

याप्रकरणी पोलीस शिपाई अजित भंगड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ओशिवरा पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस ॲक्टच्या कलम 8 (क), 21 (ब),29 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

अटकेतील आरोपींची माहिती

अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे मूळचे उत्तराखंड राज्यातील हरिद्वार जिल्ह्यातील सिकरोडा, तहसील भगवापूर येथील रहिवासी आहेत.

1.शादाब अली सत्तार अहमद, (वय 29)

2.अबीद बाबु, ( वय 28 )

Indian Police Service (IPS) officer Deven Bharti is appointed as the new commissioner of Mumbai police

पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त परमजितसिंग दाहिया आणि पोलीस उप-आयुक्त दिक्षीत गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली ओशिवरा पोलिसांनी ही यशस्वी कामगिरी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0