Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा मोठा दावा, विधानसभेत निवडून आणणार एवढ्या जागा
Sharad Pawar News : शरद पवार यांच्या मोठे भाकीत महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत 288 पैकी 225 जागा निवडून आणणार..
मुंबई :- आगामी विधानसभा निवडणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार Sharad Pawar गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रणशिंग फुंकल्याची चर्चा सध्या जोरात आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला 288 पैकी 225 जागा निवडून येऊ शकतात असे भाग्य शरद पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्यात म्हटले आहे. महाराष्ट्रातील राजकारण बदलण्याची अपेक्षा आहे. कष्ट करणाऱ्यांना शक्ती देणारे राज्य आणू या तसेच सत्य देणाऱ्या लोकांच्या जीवनात बदल आणण्याचा प्रयत्न करू या उद्योग व्यापारी असेल कोणताही घटक असेल देशात एक शक्तिमान महाराष्ट्र राज्य निर्माण करू या असे आवाहन करत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला आलेले यश आणि महायुतीच्या बाबतीत आलेले अपयश त्यामुळे यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत फार काही वेगळं चित्र दिसणार असल्याचे राजकीय तज्ञ म्हणत आहेत. काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात तसेच यंदाही महाविकास आघाडी चांगले काम करेल असा विश्वास व्यक्त करत शरद पवारांनी निवडणुकीच्या संदर्भात आणि येणाऱ्या उमेदवाराच्या संदर्भात एक भाकीच केला आहे. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार उपस्थित होते भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांमध्ये प्रवेश झाला हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केला होता. या कार्यक्रमाला शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की यंदाच्या निवडणुकीत 288 विधानसभा जागांपैकी 225 जागा या महाविकास आघाडीला मिळणार आहे. निवडणुका झाल्यावर राष्ट्रवादी सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते येत आहे चित्र बदलायचे असेल तर राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी कार्यकर्ता देतात ही चांगली गोष्ट आहे. जबरदस्त शक्ती आपण उभी करायला सुरुवात केली आहे उदगीर आणि देवळाली तील कार्यकर्ते येत आहेत गेल्या वेळेस राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून दिला. मात्र या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांनी मतदारांचा घात केला आहे. मतदारांनी मते दिले विधानसभेत पाठवले आणि त्यांची साथ सोडली आणि वेगळी भूमिका घेतली आहे. हे फार काही लोकांना आवडलेले नाही त्यामुळे यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत चांगलाच प्रकारचा धडा शिकवायची गरज आहे असे शरद पवार म्हणाले आहे.