क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Sharad Pawar : गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद ; शरद पवार

Varsha Gaikwad On Akshay Shinde : स्वसंरक्षण की हत्या? असा सवाल काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे

मुंबई :- बदलापूर बलात्कार Badlapur Rape Case प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या एन्काउंटरनंतर Akshay Shinde Encounter राजकीय प्रतिक्रिया येऊ लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार Sharad Pawar यांनी गृह खात्यावर हलगर्जीपणाचा आरोप करत सवाल उपस्थित केले आहे. तसेच गृह खात्याची कारवाई संशयास्पद असल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे. तसेच, काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड Varsha Gaikwad यांनी स्वसंरक्षण की हत्या? असं सवाल यावेळी उपस्थित केला आहे.

शरद पवार काय म्हणाले,बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित आहे.

खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला?
स्वसंरक्षण की हत्या?

एखाद्या हायप्रोफाईल प्रकरणातील आरोपीला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना सहसा अनेक पोलिस कर्मचारी बरोबर असतात. पोलिसांच्या गरड्यात असताना बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलिसांचे पिस्तूल हिसकावून पोलिसांवरच गोळ्या झाडतो, यावर कुणाचा विश्वास बसेल? आणि ते जरी घडलं असेल तर पोलिसांनी त्याला आटोक्यात आणून का पकडता आलं नाही? हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर आणि संशयास्पद आहे. पोलिस आणि राज्याच्या गृहखात्यात नक्की चाललंय तरी काय?

बदलापूर प्रकरणात याआधीच पोलिसांवर प्रकरण दडपण्याचे, गुन्हा नोंदवण्यास उशीर करण्याचे गंभीर आरोप झालेले आहेत. या प्रकरणातील शाळेचे संस्थापक तुषार आपटे यांचे भाजपाशी संबंध असून तो अजूनही फरार आहे. त्याला अजून पोलीस का पकडू शकले नाहीत? आरोपीच्या आईने आणि भावाने दिलेले जवाब कसं दुर्लक्षित करता येतील?

त्यामुळे जागच्या जागी हे संपूर्ण प्रकरण दडपण्यासाठी आणि या प्रकरणाचे धागे दोरे ज्यांच्या दिशेने जात आहेत त्यांना संरक्षण देण्यासाठी तर अक्षय शिंदेची हत्या करण्यात आलेली नाही ना? याची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे.

राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा तीन तेरा वाजलेत, पण राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हे सत्ताकारणात व्यग्र आहेत. खरं तर या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राजीनामा दिला पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0