
Ajit Pawar On Sharad Pawar Birthday : राजकीय मतभेदांना बगल देत अजित पवारांनी ‘आदरणीय’ शब्दाने व्यक्त केल्या सदिच्छा; ट्विटद्वारे दिल्या हार्दिक शुभेच्छा
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar Birthday आज (12 डिसेंबर) आपला 85 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या विशेष दिनानिमित्त त्यांना देशभरातून आणि राजकीय वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांनीही त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. सत्तासंघर्षातून राजकीय मतभेद निर्माण झालेले असतानाही, अजित पवारांनी केलेल्या या शुभेच्छांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.
अजित पवार यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून ट्विट करत म्हटले आहे की, “आदरणीय श्री शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.” त्यांनी वापरलेला ‘आदरणीय’ हा शब्द आणि दिलेला शुभेच्छा संदेश यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त, अजित पवार यांनी व्यक्त केलेल्या सदिच्छा सलोख्याचे आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचे दर्शन घडवणाऱ्या ठरल्या आहेत.



