मुंबई

Sharad Pawar-Ajit Pawar : शरद पवार-अजित पवार एकत्र जेवणार! – पवारांनी वाढदिवसानिमित्त अजितदादा आणि प्रफुल्ल पटेलांना स्नेहभोजनाचे दिले निमंत्रण

Sharad Pawar Birthday : दिल्लीतील निवासस्थानी होणार भेटीगाठी; ‘महाविकास आघाडी’च्या सर्व खासदारांनाही आमंत्रण; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुंबई :- राज्यात महापालिका निवडणुकांचे वातावरण तापले असतानाच राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सध्या दोन वेगवेगळ्या राष्ट्रवादी पक्षांमध्ये असलेले खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच एकाच व्यासपीठावर एकत्र दिसण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अजित पवार आणि अजित पवार गटाचे बडे नेते प्रफुल्ल पटेल यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले आहे, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

स्नेहभोजनाचे निमंत्रण

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी दोन दिवसांनी असलेल्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी आयोजित केला आहे.या कार्यक्रमासाठी शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना आणि महत्त्वाच्या नेत्यांना निमंत्रित केले आहे.

विशेष म्हणजे, यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे काही नेते देखील आहेत. शरद पवार यांनी स्वतःहून प्रफुल्ल पटेल यांना फोन करून निमंत्रण दिले आहे, ज्यामुळे पटेल या स्नेहभोजनासाठी उपस्थित राहणार आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील दिल्लीमध्ये जाण्याची शक्यता असून, ते या स्नेहभोजनात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राजकीय चर्चांना उधाण

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीचे सर्व खासदार, नेते, तसेच अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल एकत्र येण्याची शक्यता असल्याने दोन्ही राष्ट्रवादी पक्ष भविष्यात एकत्र येतील का, याबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

या भेटीबाबत, ‘ही फक्त स्नेहभोजनाचीच भेट आहे’, असे अजित पवार यांच्या पक्षाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, राज्याच्या राजकारणाची दिशा काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago