Mumbai Weather News: भरतीचा धोका वाढतोय! मुसळधार पावसाची शक्यता, समुद्रात उसळणार 4.74 मीटर उंच लाटा

Mumbai High Tide Alert : सखल भागात पाणी साचण्याचा इशारा; मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आवाहन
मुंबई | मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर कमी झाला असला तरी गुरुवारी दुपारी 12.55 वाजता समुद्रात सुमारे 4.75 मीटर उंच लाटा उसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याच कालावधीत पावसाचा जोर वाढल्यास, सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Mumbai Weather News
मुंबईला चारही बाजूंनी समुद्राने वेढलेले असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात भरतीचा धोका अधिकच गंभीर ठरतो. पावसाचे पाणी समुद्रात जाण्याऐवजी उलट भरतीच्या पाण्यासह शहरात परत येते, त्यामुळे रस्ते, रेल्वे स्थानक आणि इतर सखल भाग जलमय होतात.
पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती, नोकरदार आणि शालेय विद्यार्थ्यांचे हाल झाले होते. आता पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व भरतीचा तडाखा एकत्र आला तर शहराचा वेग मंदावण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी ही काळजी घ्यावी:
- भरतीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळा
- हवामान विभाग व महानगरपालिकेच्या सूचना काळजीपूर्वक पाळा
- सखल भागांतील नागरिकांनी वाहनं सुरक्षित स्थळी हलवावीत
मुंबई महानगरपालिका आणि हवामान विभागाने नागरिकांना “सावध रहा, सुरक्षित राहा” असा संदेश दिला असून, प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे. तरीही सावधगिरीच सर्वोत्तम सुरक्षा असल्याचे स्पष्ट आहे. Mumbai Latest News


