महाराष्ट्र

Shani Shingnapur : शनि शिंगणापूर मंदिरातून 167 कर्मचाऱ्यांची कपात!

•114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती; धार्मिक पाश्र्वभूमीवरून वादाचे वारे

अहमदनगर | अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध शनि शिंगणापूर मंदिरातील व्यवस्थापन समितीने मोठा निर्णय घेत 167 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले आहे. विशेष म्हणजे यापैकी तब्बल 114 कर्मचारी मुस्लिम समाजातील असल्याने या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

मंदिर ट्रस्टने या निर्णयामागे शिस्तभंग आणि प्रशासनातील अनियमितता कारणीभूत असल्याचे सांगितले आहे. अनेक कर्मचारी मागील पाच महिन्यांपासून कोणतीही पूर्वसूचना न देता कामावर गैरहजर होते. मुख्यतः शेती विभाग, कचरा व्यवस्थापन आणि शैक्षणिक विभागातील कर्मचाऱ्यांना याची झळ बसली आहे.

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भाजपच्या आध्यात्मिक समन्वय मोर्चाचे प्रमुख आचार्य तुषार भोसले म्हणाले, “मुस्लिम कर्मचाऱ्यांची नियुक्ती हे चुकीचे पाऊल होते. आम्ही सकल हिंदू समाजाच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन केले होते आणि त्याचा परिणाम म्हणूनच ट्रस्टला झुकावे लागले.” त्यांनी याला ‘सकल हिंदू समाजाच्या एकजुटीचा विजय’ असे संबोधले.

मात्र, या निर्णयामागे धार्मिक आणि राजकीय दबावही असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. 14 जून रोजी नियोजित आंदोलनाच्या एक दिवस आधी ट्रस्टने ही बैठक घेऊन अचानकपणे बडतर्फीचा निर्णय घेतल्याने परिस्थिती अधिकच तापली आहे.

दरम्यान, ट्रस्टचे ट्रस्टी अप्पासाहेब शेटे यांनी यावर स्पष्टीकरण देत सांगितले की, “धर्माच्या आधारावर नव्हे, तर कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थिती आणि कामकाजातील शिथिलतेच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना पूर्वसूचना देण्यात आली होती.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0