शहापूर : पाच हजाराची लाच घेताना ग्रामपंचायत अधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

Shahpur Latest Bribe News : प्रलंबित कामासंदर्भातील पत्र देण्याकरिता लाचेची मागणी
शहापूर :- प्रलंबित काम संदर्भातील पत्र देण्याकरिता ग्रुप ग्रामपंचायत वरस्कोळ शहापूर येथील पंचायत अधिकारी यांनी तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. 5 Thousand Bribe News सुरेश गणेश राठोड, (वय 41) असे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे नाव आहे.
लोकसेवक सुरेश राठोड यांनी, तक्रारदार यांचे प्रलंबित कामासंदर्भातील पत्र देण्याकरीता यातील तक्रारदार यांचेकडे स्वतः करीता पाच हजारांची लाचेच्या रक्कमेची मागणी केली होती.यातील तक्रारदार यांनी लोकसेवक यांचेविरूध्द कारवाई करण्याकरिता ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे येथे 1 जानेवारी 25 रोजी लेखी तक्रार दिलेली आहे.
एसीबीने तक्रारीच्या अनुषंगाने 2 जानेवारी रोजी केलेल्या पडताळणी कारवाई मध्ये यातील लोकसेवक सुरेश राठोड यांनी तक्रारदार यांचे प्रलंबित कामाचे अनुषंगाने पत्र देण्याकरीता तक्रारदार यांचेकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती तीन हजार लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले.
त्याअनुषंगाने 3 जानेवारी रोजी एसीबीने सापळा रचून दरम्यान लोकसेवक गणेश राठोड यांना तक्रारदार यांचकडून तीन हजार रुपयांची लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहात पकडण्यात आलेले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबी पथक
शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे,सुहास शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे. संजय गोविलकर, अपर पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजश्री शिंदे यांच्या पथकाने कारवाई करत लाचखोर ग्रामपंचायताच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.